Lambretta New Model : परत येणार जुनी लॅम्ब्रेटा स्कूटर?, पाहा या दोन मॉडेल्सचे जबरदस्त फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 19:07 IST
1 / 7एक काळ असा होता जेव्हा भारतात लॅम्ब्रेटा स्कूटर खरेदी करणे ही अभिमानाची बाब मानली जात होती. त्यावेळी अनेकांना ही स्कूटर आपल्याकडे हवीहवीशी वाटायची. इटालियन स्कूटर कंपनीने अलीकडेच दोन नवीन मॉडेल सादर केले आहेत.2 / 7Lambretta Scooters ने अलीकडेच मिलान डिझाईन वीक 2022 मध्ये दोन नवीन मॉडेल G350 आणि X300 लाँच केले. या स्कूटर्स सध्या आंतरराष्ट्रीय बाजारासाठी लाँच करण्यात आल्या आहेत. भारत ही स्कूटरसाठी जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी बाजारपेठ आहे.3 / 7लॅम्ब्रेटाच्या या दोन्ही स्कूटरचे डिझाईन जुन्या सिग्नेचर लुकवाले म्हणजेच रेट्रो आहे. तर फिचर्स आणि स्टाइलच्या बाबतीत ही एकदम नवीन स्कूटर आहे. हे कंपनीचे दोन्ही टॉप लाइन मॉडेल असतील.4 / 7कंपनीने या स्कूटर्सचे साइड पॅनल इंटरचेंजेबल केले आहेत. म्हणजेच, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही अतिरिक्त साइड पॅनल्स घेऊन त्याचा लूक दररोज बदलू शकता. त्याच वेळी, त्याच्या डॅशबोर्डवर टीएफटी डिस्प्ले आणि यूएसबी चार्जर देखील दिले गेले आहेत.5 / 7X300 मध्ये कंपनीनं 275 सीसीचं सिंगल सिलिंडर इंजिन दिलं आहे. हे 25एचपीची पॉवर आणि 24.5एनएमचा टॉर्क जनरेट करते. तर G350 चं इंजिन 27.5 एचपीची मॅक्स पॉवर आणि 27 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.6 / 7या दोन्ही स्कूटर एलईडी लाइटिंग आणि ABS सारख्या स्मार्ट फीचर्ससह येतात. X300 च्या कन्सोलवर तुम्हाला सेमी-डिजिटल स्क्रीन मीटर मिळेल, परंतु तो चावीशिवायदेखील ऑपरेट करता येऊ शकतो. दुसरीकडे, हे फीचर G350 मध्ये उपलब्ध नाही.7 / 7कंपनीने हे मॉडेल ग्रे, ब्लॅक, रेड आणि ग्रीन या चार रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च केले आहेत. त्याची युरोपमधील किंमत नुकतीच उघड झाली आहे. G350 ची किंमत 7200 युरो (सुमारे 5.9 लाख रुपये) आणि X300 ची किंमत 5900 युरो (सुमारे 4.8 लाख रुपये) असेल.