शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Hero Destini 125 प्लॅटिनम एडिशन लाँच; पाहा, नवीन रंग, किंमत आणि आकर्षक वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 4:23 PM

1 / 10
मोटरसायकल आणि स्कूटर उत्पादनात जगभरात सर्वांत मोठी कंपनी म्हणून हिरो कंपनीची ओळख आहे. आतापर्यंत हिरो मोटरकॉर्प या कंपनीने कोट्यवधी भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आपल्या निर्मितीत वैविध्य आणि वैशिष्ट्य राखत आघाडीची कंपनी होण्याचा मानही या कंपनीने राखला आहे.
2 / 10
विविध प्रकारचे अभिकल्प, आकर्षक वैशिष्ट्यांसह हिरो मोटरकॉर्प आपली उत्पादने भारतीय बाजारात सादर करत असते. याचाच एक भाग म्हणून आपल्या स्कूटरचा पोर्टफोलियो आणखी मजबूत करण्यासाठी नवीन Hero Destini 125 Platinum Edition लाँच केले आहे.
3 / 10
डेस्टिनी 125 प्लॅटिनम प्रीमियम स्कूटर मानली जाते. यात डिजाइन आणि थीमच्या अनेक नवीन एलिमेंट्सचा समावेश आहे. मॅस्ट्रो एज 125 स्टील्थ आणि प्लेजर प्लस प्लेटिनम प्रमाणे ही नवीन स्कूटर हिरोच्या स्कूटर पोर्टफोलियोत रेंजचा विस्तार करीत आहे.
4 / 10
Hero Destini 125 Platinum Edition ही स्कूटर देशातील हिरोच्या मोटोकॉर्प डिलरशीपवर उपलब्ध आहे. नवीन डेस्टिनी १२५ प्लॅटिनममध्ये एक्ससेंस टेक्नोलॉजीचे १२५ सीसी बाइक्स ६ कॉम्प्लाएंट प्रोग्राम्ड फ्यूल इंजेक्शन इंजिन दिले आहे.
5 / 10
नवीन डेस्टिनी १२५ प्लॅटिनमचे हे इंजिन ७००० आरपीएमवर ९ बीएचपीचे जबरदस्त पॉवर आउटपूट देते. सोबत ५५०० आरपीएमवर १०.४ एनएमचेटॉर्क-ऑन-डिमांड जनरेट करते.
6 / 10
नवीन डेस्टिनी 125 प्लॅटिनममध्ये सर्व सुविधा आणि इंधन बचतीसाठी हिरोची सुलभ आय३ एस (आयडल-स्टॉप-स्टार्ट सिस्टम) देण्यात आली आहे. याशिवाय, एक डिजिटल-एनालॉग स्पीडोमीटर, साइड स्टँड इंडीकेटर आणि सर्विस ड्यू रिमाइंडर फीचर्स दिले आहेत.
7 / 10
नवीन डेस्टिनी 125 प्लॅटिनममध्ये जास्त आकर्षक, सिग्नेचर एलईडी गाइड लँप, प्रीमियम बेजिंग, शीट मेटल बॉडी आणि नवीन ब्लॅक एंड क्रोम थीम देण्यात आली आहे.
8 / 10
डेस्टिनी 125 प्लॅटिनम एडिशनमध्ये क्रोम मफलर प्रोटेक्टर आणि क्रोम फेंडर स्ट्राइप याच्या स्टाइल आणि टिकाऊपन आणखी वाढवते. सोबत यात प्लॅटिनम हॉट स्टाम्पिंगेयरची रंगीत सीट मिळते. याचे आकर्षण आणखी वाढते.
9 / 10
नवीन डेस्टिनी १२५ प्लॅटिनम एडिशन नवीन मेट ब्लॅक कलर, ब्राउन इनर पॅनेल्स आणि व्हाइट रिम टेपसोबत लाँच करण्यात आले आहे.
10 / 10
नवीन डेस्टिनी १२५ प्लॅटिनम एडिशनची दिल्लीतीली एक्स शोरूम किंमत ७२ हजार ०५० रुपये आहे. होंडा अॅक्टिव्हा १२५, सुझुकी अॅक्सेस १२५ यांच्याशी हिरोच्या डेस्टिनी १२५ ची थेट स्पर्धा असून, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन क्लृप्त्या काढल्या जात आहेत.
टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्प