लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सहा महिन्यांत Kia च्या १ लाख कार्सची विक्री; ग्राहकांची सर्वाधिक पसंती 'या' कारला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 13:39 IST
1 / 10सर्वच कार उत्पादक कंपन्यांनी जुलै महिन्यातील आपल्या कार्सच्या विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. यादरम्यान जुलै २०२१ मध्ये Kia India च्या आपल्या वार्षित विक्रीमध्ये ७६ टक्क्यांची वाढ झाली. 2 / 10कंपनीनं गेल्या महिन्यात १५,०१६ गाड्यांची विक्री केली आहे. तसंच कॅलेंडर वर्ष २०२१ मध्ये कंपनीनं १ लाख कार्सच्या विक्रीची संख्याही पार केल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. 3 / 10दरम्यान, किया मोटर्सनं आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक फायनॅन्स स्कीमही लाँच केल्या आहेत. 4 / 10जुलै महिन्यात विक्री झालेल्या गाड्यांपैकी सर्वाधिक विक्री ही सब-कॉम्पॅक एसयुव्ही Kia Sonet ची होती. गेल्या महिन्यात या कारच्या ७,६५ युनिट्सची विक्री झाली आहे. 5 / 10याप्रमाणे कंपनीनं मीड साईज एसयूव्ही Kia Seltos लाही ग्राहकांची पसंती मिळाली आहे. जुलै महिन्यात किआ सेल्टोसच्या ६,९८३ युनिट्सची विक्री झाली. तर Carnival MPV च्या ३२८ युनिट्सची विक्री झाली. 6 / 10दरम्यान, दक्षिण कोरियाची कंपनी कियानं यापूर्वीच आपण २०२२ मध्ये भारतात आपली चौथी कार लाँच करणार असल्याची घोषणा केली होती. 7 / 10ही सेल्टोसच्या प्लॅटफॉर्मवर आधारित एक कॉम्पॅक्ट MPV असू शकते. Kia KY कोडनेम असलेल्या या कारची स्पर्धा मारूती अर्टिगा, महिंद्रा मराझो आणि ह्युदाई, तसंच एमच्या आगामी कॉम्पॅक्ट एमपीव्हीशी असणार आहे. 8 / 10यामध्ये सेल्टोसपासून इन्सपायर्ज डिझाईन, फीचर्स आणि इंजिन असण्याची शक्यता आहे. कियाची कॉम्पॅक्ट एमपीव्ही ६ किंवा ७ सीट लेआऊटसह लाँच केली जाऊ शकते. 9 / 10यांची लांबी जवळपास ४.५ मीटर असू शकते. तसंच ही सेल्टोस प्रमाणेच असेल. भारतात ३ रॉ एमपीव्हीचं उत्पादन अनंतपुर येथील प्रकल्पात केलं जाणार आहे. 10 / 10कंपनी ही कार इंडोनेशियासह अन्य बाजारपेठेतही निर्यात करू शकते. कंपनीचं वर्षाला ५० हजार युनिट्स विक्रीचं लक्ष्य आहे.