Kia नं केली कमाल, २ वर्षांत २ लाखांपेक्षा अधिक Seltos ची विक्री; पाहा किती आहे किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 19:34 IST
1 / 9Kia च्या कार्सना भारतात ग्राहकांची पसंती मिळताना दिसत आहे. कियानं भारतातील आपल्या कामकाजाच्या दोन वर्षांमध्ये आपल्या कॉम्पॅक्ट SUV Seltos च्या 2 लाखांपेक्षा अधिक युनिट्सची विक्री केली आहे.2 / 9याशिवाय कंपनीनं भारतात आपलं कामकाज सुरू केल्यानंतर दीड लाखांपेक्षा अधिक कनेक्टेड कार्सचीही विक्री केली आहे. या महिन्याच्याच सुरूवातील कियानं हा मोठा पल्ला गाठला3 / 9तीन लाख युनिट्सचा सेल पार करणारी Kia ही फास्टेस्ट मॅन्युफॅक्चरर कंपनी बनली आहे. कियानं दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या एकूण विक्रीमध्ये Seltos चा हिस्सा 66 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. 4 / 9सेल्टोसची 58 टक्के विक्री ही टॉप व्हेरिअंट्सची झाली आहे. तर दुसरीकडे किलाय सेल्टोसच्या ऑटो व्हेरिअंट्सचा सेल 35 टक्के इतका राहिला आहे.5 / 9Kia Seltos च्या एकूण विक्रीमध्ये डिझेल व्हेरिअंट्सच्या विक्रीचा हिस्सा 45 टक्के राहिला आहे. सल्टोसच्या नव्या लाँच झालेल्या iMT व्हेरिअंटला ४ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत उत्तम रिस्पॉन्स मिळाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. 6 / 9कनेक्टेड कार्सच्या विक्रीबद्दल सांगायचं झालं तर कनेक्टेड कार्सच्या विक्रीत Kia Seltos चा हिस्सा 78 टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. ग्राहकांनी Kia Seltos च्या HTX 1.5 पेट्रोल व्हेरिअंटला अधिक पसंती दिल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.7 / 9Kia Seltos तीन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये पहिला पर्याय मध्ये 1.5 लीटरचं इंजिन 115bhp ची पॉवर जनरेट करतं. तसंच ही कार 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन, एक CVT युनिट आणि iMT गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे.8 / 9तर दुसरीकडे 1.4 लीटर टर्बो पेट्रोल मोटर केवळ सेव्हन स्पीड DCT युनिटसह स्टेअरिंग माऊंटेड पॅडल शिफ्टर्ससह सादर करण्यात आली आहे. याचं इंजिन 140bhp ची पॉवर जनरेट करतं. तर 1.5 लीटर डिझेल इंजिन 115bhp ची पॉवर जनरेट करतं.9 / 9किया सेल्टोसच्या पेट्रोल व्हर्जनची किंमत 9.96 लाखांपासून सुरू होऊन 17.65 लाखांपर्यंत जाते. तर डिझेल व्हेरिअंटची किंमत 10.45 लाखांपासून ते 17.86 लाखांदरम्यान जाते. या कारची स्पर्धा ह्युंदाई क्रेटा, निसान किक्स आणि रेनो डस्टरसह आहे.