Hyundai चा दावा, Ioniq 5 इलेक्ट्रीक कार इतकी देणार पॉवर की फ्रिज, मायक्रोव्हेवही चालेल; पाहा काय आहे खास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 11:54 IST
1 / 15प्रमुख कार उत्पादक कंपनी ह्युंदाईनं नुकतीच आपली नवी इलेक्ट्रीक कार Ioniq 5 प्रदर्शित केली. या प्रीमिअम सेडान कारचा ग्लोबल डेब्यू करण्यात आला. 2 / 15कंपनीच्या प्रमोशनल व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की कारमधील बॅटरी इतकी पॉवर निर्माण करते की ती मायक्रोवेव्ह ओव्हनसारखी उपकरणे, ट्रेड मील आणि फ्रीजसारखी अप्लायन्सेस चालवू शकते. 3 / 15या कारमदध्ये दुसऱ्या रो मध्ये देण्यात आलेल्या पॉवर सॉकेटमध्ये तुम्ही लॅपटॉपसारखे डिव्हाईस कनेक्ट करू शकता.4 / 15तसंच मोठ्या स्पीकर्ससह पोर्टेबल ओव्हन आणि रेफ्रिजरेटरलादेखील चालवता येऊ शकतं. 5 / 15कंपनीचा दावा आहे की ही कार 3.6 किलोव्हॅट पर्यंत क्षमतेचं इलेक्ट्रीक पॉवर जनरेट करते. 6 / 15Hyundai चा दावा आहे की ही अशी पहिली कार आहे ज्यात बाय-डायरेक्शनल चार्जिंगची सुविधा उपलब्ध करते. 7 / 15यावरून ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस कारमधील बॅटरीतून पॉवर देऊ शकते. 8 / 15सामान्य इलेक्ट्रीक कार्सची बॅटरी केवळ लॅपटॉप आणि मोबाईलसारख्या डिव्हाईसेसना चार्ज करण्याची सुविधा देतात. परंतु यात मिळणाऱ्या सुविधा या अधिक आहेत.9 / 15Hyundai Ioniq 5 या कारमध्ये ड्युअल बॅटरीसोबतच रुफवर सोलार पॅनल इन्स्टॉल करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. 10 / 15हा सोलार पॅनल एक्स्ट्रा ड्रायव्हिंग रेंजही देतो. ज्याद्वारे कार वर्षाला १ हजार ३०० किलोमीटरची रेंज कव्हर करू शकते. 11 / 15कंपनी पुढील काही महिन्यात ही कार विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करु शकते. 12 / 15Hyundai Ioniq 5 चं हे मवं मॉडेल फँकफर्ट मोटर शोमध्ये सादर करण्यात आलेल्या 45 कॉन्सेप्टचं प्रोडक्शन व्हर्जन आहे. 13 / 15या कारमध्ये कंपनीनं पॉप अप डोअर हँडल्स. रॅक्ड फ्रन्ट विंडशिल्ड. ब्लॅक रुफ, स्लिक LED, हेडलँपसह 20 इंचाचे अलॉय व्हिल्सही दिले आहेत. 14 / 15या कारसोबत देण्यात आलेला फास्ट चार्जिंगनं 5 मिनिटे बॅटरी चार्ज केल्यावर कार किमान १०० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. 15 / 15तसंच १८ मिनिटांत या कारची बॅटरी पूर्ण चार्ज होऊ शकते. सिंगल चार्ज मध्ये ही कार 480 किलोमीटरपर्यंतची रेंज देते.