शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 19:02 IST

1 / 7
ह्युंडाई इंडियाने सप्टेंबर 2025 साठी आपल्या कार्सवर मिळणाऱ्या डिस्काउंटची घोषणा केली आहे. कंपनीने फेस्टिव सीझनच्या निमित्ताने आपल्या गाड्यांवर आकर्षक ऑफर्स दिल्या आहेत.
2 / 7
या महिन्यात तुम्ही हुंडई व्हेन्यू खरेदी केली, तर तुम्हाला 70,000 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. इतकंच नाही, तर नव्या GST मुळे या कारवर 1,10,376 रुपयांपर्यंत कर (Tax) कमी झाला आहे.
3 / 7
सध्या या कारची एक्स-शोरूम किंमत 7,94,100 रुपये आहे, जी 22 सप्टेंबरपासून 7,26,381 रुपये होणार आहे. त्यामुळे या महिन्यात कार खरेदी करणाऱ्यांना या ऑफिरचा खूप चांगला फायदा होणार आहे.
4 / 7
इंजिन व मायलेज: ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही ट्रान्समिशनसह येते. 1.2-लिटर पेट्रोल मॅन्युअलचे मायलेज 17.52 किमी/लीटर आहे, 1.0-लिटर टर्बो पेट्रोल आयएमटीचे मायलेज 18.07 किमी/लीटर आहे, 1.0-लिटर टर्बो पेट्रोल डीसीटी (ऑटोमॅटिक)चे मायलेज 18.31 किमी/लीटर आहे, तर 1.5-लिटर डिझेल मॅन्युअलचा मायलेज 23.4 किमी/लीटर आहे.
5 / 7
फीचर्स: यात स्मार्ट इलेक्ट्रिक सनरुफ, एलईडी डीआरएल, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्टसह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते.
6 / 7
सेफ्टी: सेफ्टीचादेखील काळजीपूर्वक विचार करण्यात आला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, यात 6 एअरबॅग्ज, टीपीएमएस हायलाइन, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ईएससी), हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल (एचएसी) आणि मागील कॅमेरा यासारख्या सेफ्टी फीचर्सचा समावेश आहे.
7 / 7
या एसयूव्हीमध्ये रंगीत टीएफटी मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले (एमआयडी) सह डिजिटल क्लस्टर देखील आहे, जे अचूक आणि सुलभ माहितीसह ड्रायव्हिंग अनुभव वाढवते. आपल्या सेगमेंटमध्ये, व्हेन्यू थेट किआ सोनेट, मारुती ब्रेझा, स्कोडा कयालक आणि महिंद्रा XUV 3XO सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करते.
टॅग्स :Hyundaiह्युंदाईcarकारGSTजीएसटी