1 / 7ह्युंदाई मोटर्स (Hyundai India) आपली नवीन एसयुव्ही (SUV) ह्युंदाई एक्स्टर लवकरच भारतात लाँच करणार आहे. कंपनी 10 जुलै रोजी ही कार भारतात लाँच करेल. Hyundai ने आतापर्यंत निरनिराळ्या टीझर्समध्ये एक्सटरचं डिझाईन दाखवलं होतं. 2 / 7याशिवाय कंपनीनं पॉवरट्रेन लाइन-अप आणि एसयुव्हीची काही फीचर्स देखील उघड केली आहेत. ही एसयुव्ही भारतीय बाजारपेठेतील कंपनीच्या लाइनअपमधील सर्वात लहान आणि परवडणारी एसयुव्ही असेल. 3 / 7याशिवाय सध्याच्या व्हेन्यू या मॉडेलच्या नंतर पोझिशन होऊ शकते. कंपनीनं या एसयूव्हीची अधिकृत बुकिंग देखील सुरू केली आहे. तुम्हाला ही कार अधिकृत वेबसाइट आणि अधिकृत डीलरशिपद्वारे बुक करता येणार आहे.4 / 7ह्युंदाईनं दिलेल्या माहितीनुसार एक्स्टरमध्ये देण्यात आलेलं सनरूफ वॉईस अनेबल्ड असेल आणि ओपन द सनरूफ किंवा आय वाँट टू सी द स्काय सारखी कमांड देऊन सनरूफ रिस्पॉंड करेल. याशिवाय यात फ्रन्ट डॅशकॅम रिअर कॅमेरा, 2.31 इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आलेय.5 / 7याशिवाय स्मार्टफोन ॲप बेस्ड कनेक्टिव्हीटी आणि अनेक रेकॉर्डिंग मोड देण्यात आलेत. यामध्ये तुम्हाला फुल एचडी व्हिडीओ रिझॉल्युशन मिळेल. ही कार एकूण EX, S, SX, SX(O) आणि SX(O) कनेक्ट या व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. ही कार टाटा पंच, रेनो किगर, निसान मॅग्नाईट सारख्या मॉडेल्सना टक्कर देईल.6 / 7Exter मध्ये, कंपनी 1.2-लीटर काप्पा पेट्रोल इंजिन देण्यात आलंय. याचा वापर Grand i10 Nios, i20 आणि Venue सारख्या मॉडेल्समध्येही करण्यात आलंय. जरी याच्या पॉवर आउटपुटबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, परंतु असं म्हटलं जातं की हे इंजिन 83hp पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करेल. ही एसयूव्ही कंपनी फिटेड सीएनजी व्हेरियंटमध्येही उपलब्ध असेल. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे.7 / 7यामध्ये 40 पेक्षाही अधिक सेफ्टी फीचर्स सामील केल्याचा दावा कंपनीनं केलाय. दरम्यान, यातील 26 फीचर्स सर्वच व्हेरिअंटमध्ये येण्याची शक्यता आहे. कंपनी ही कार रेंजर खाकी नव्या कलरमध्येही लाँच करण्यात येणार आहे.