नवीन कारवर मोठी बचत, Honda कडून शानदार ऑफर्स, या महिन्यात मोठा डिस्काउंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 16:46 IST
1 / 6नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात इतर कार कंपन्यांप्रमाणे होंडानेही ( Honda) आपल्या ग्राहकांसाठी शानदार ऑफर्स आणल्या आहेत. कंपनी आपल्या अनेक कारवर डिस्काउंट देत आहे. कंपनीच्या या ऑफरचा लाभ ऑक्टोबर महिन्यात घेता येईल. डिस्काउंटच्या ऑफरमध्ये होंडा सिटी (Honda City), होंडा अमेज (Honda Amaze), होंडा डब्ल्यूआरव्ही (Honda WRV) आणि होंडा जॅझ (Honda Jazz) सारख्या कारचा समावेश आहे. 2 / 6म्हणजेच, जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल आणि होंडाची घेणार असाल, तर एकूणच ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी असू शकते. होंडाच्या ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट, कॉर्पोरेट सूट आणि एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे. चला जाणून घेऊया, कोणत्या कारवर किती डिस्काउंट मिळत आहे.3 / 6या कारवर एकूण 39,298 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. यामध्ये 10,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट किंवा 12,298 रुपयांची फ्री अॅक्सेसरीज दिली जात आहेत. याशिवाय 7,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि एक्सचेंजवर 10 हजार रुपयांचा डिस्काउंट आहे. ग्राहकांना 5,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि 5,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देखील दिला जात आहे.4 / 6या कारवर एकूण 37,896 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. होंडा सिटी जेन 5 चे ग्राहक 10,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट किंवा 10,896 रुपयांच्या मोफत ऍक्सेसरीजचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय 5,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस तसेच 5,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे. तुम्ही 7,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि एक्सचेंजवर 10,000 रुपयांच्या डिस्काउंटचा लाभ देखील घेऊ शकता.5 / 6होंडा जॅझवर 25 हजार रुपयांचा डिस्काउंट आहे. या कारवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट, 7000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 5000 रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे. या कारची विक्री पुढील महिन्यात बंद होण्याची शक्यता आहे.6 / 6होंडा अमेज कॉम्पॅक्ट सेडानवर एकूण 8,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. यामध्ये 5000 रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि 3000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंटचा समाविष्ट आहे. दरम्यान, कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी ही कार आहे.