याला म्हणतात मायलेज! मुंबई-पुणे ६ वेळा प्रवास करा; हिरोची स्वस्तात मस्त बाइक, ९९० किमी रेंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 12:19 IST
1 / 9आताच्या घडीला स्वदेशी कंपनीच्या उत्पादनांना मोठी मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रातही मेक इन इंडिया कंपन्या धुमाकूळ घालत असल्याचे दिसत आहेत. कार असो किंवा बाइक, स्कूटर असो, भारतीय कंपन्यांचा बोलबाला असल्याचे दिसून येत आहे. 2 / 9टू व्हिलर सेक्टरमध्ये गेल्या अनेक दशकांपासून भारतीयांच्या मनावर अधिराज्य करत असलेली हिरो मोटोकॉर्प कंपनी अनेकविध प्रकारच्या बाइक, स्कूटर सादर करत आहे. महागड्या पेट्रोल मुळे भारतात सर्वात जास्त मायलेजच्या बाइक खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर हिरोची एक बाइक बेस्ट ऑप्शन आहे. 3 / 9आगामी काळात इंधन दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बाइकची एकदा पेट्रोलची टाकी फुल केल्यानंतर तब्बल ९९० किमी पर्यंतचा प्रवास तुम्ही करू शकता, असा दावा केला जात आहे. 4 / 9Hero Splendor Pro असे या बाइकचे नाव आहे. ही बाइक देशातील सर्वांत जास्त विकणाऱ्या बाइकपैकी एक आहे. एका माहितीनुसार, हिरो स्पेंडर प्रो ही बाइक ९० kmpl चे मायलेज देते. याचे फ्यूल टँक ११ लीटरहून जास्त आहे. त्यामुळे फ्यूल टँक कॅपिसिटी आणि मायलेजचा आढावा घेतल्यास एकदा टँक फुल केल्यानंतर ही बाइक ९९० किमी पर्यंत अंतर पार करू शकते. 5 / 9Hero Splendor Pro ची किंमत ४९ हजार ४८५ रुपये (एक्स शोरूम, दिल्ली) आहे. या बाइक मध्ये 97.2cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. जे 8.24 bhp पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. 6 / 9Hero Splendor वेरिएंटच्या लिस्ट मध्ये Pro, Plus, i3S आणि iSmart 110 चा समावेश आहे. या बाइकमधील दोन्ही व्हील मध्ये ड्रम ब्रेक आणि ट्यूबचे टायर दिले आहे. 7 / 9Hero Splendor Pro बाइकची लांबी १९४५ एमएम आहे. रुंदी ७५२ एमएम आहे. यासोबतच याची उंची १०७२ एमएम आहे. या बाइकचे वजन ११५ किलोग्रॅम आहे. 8 / 9Hero Splendor Pro या बाइकने दिल्ली ते जम्मू काश्मीरमधील श्रीनगरच्या डल झीलच्या रस्त्यांपर्यंत म्हणजेच ८१२.२ किमी पर्यंत अंतर आहे. म्हणजेच तुम्हाला ८६० रुपयाच्या पेट्रोलवर काश्मीर पर्यंत जाता येऊ शकते. इतकेच नव्हे तर सुमारे १५० किमी अंतर असलेल्या मुंबई-पुणे मार्गावर किमान ६ वेळा तुम्ही प्रवास करू शकता, असा दावा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 9 / 9बाइक खरेदी करण्याआधी अनेक ग्राहक बाइकचे मायलेज चेक करीत असतात. मार्केटमध्ये Hero Splendor Pro बाइक आहे. जिचे मायलेज जबरदस्त आहे.