शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 17:00 IST

1 / 5
Maruti Suzuki: शानदार मायलेज, आधुनिक फीचर्स आणि कमी किमतीमुळे मारुती सुझुकीची नवीन हायब्रिड SUV Victoris भारतीय बाजारात प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये या SUVची तब्बल 12,300 हून अधिक युनिट्स विक्री झाली असून, हायब्रिड सेगमेंटमधील ही सर्वाधिक विक्री होणारी SUV ठरली आहे.
2 / 5
Maruti Suzuki Victoris ची एक्स-शोरूम किंमत 10.49 लाख रुपयांपासून सुरू होऊन 19.99 लाख रुपयांपर्यंत जाते. दिल्लीमध्ये बेस व्हेरिएंटची ऑन-रोड किंमत सुमारे 12 लाख रुपये आहे. या दरात हायब्रिड तंत्रज्ञान मिळत असल्याने Victoris ही भारतातील सर्वात किफायतशीर हायब्रिड SUV म्हणून लोकप्रिय झाली आहे. याच कारणामुळे ती Maruti Grand Vitara आणि Toyota Hyryder सारख्या लोकप्रिय SUVsना कडवी टक्कर देत आहे.
3 / 5
Victoris मध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, ते माइल्ड हायब्रिड तंत्रज्ञानासह 102 bhp पॉवर निर्माण करते. याशिवाय स्ट्रॉन्ग हायब्रिड आणि CNGचे पर्यायही उपलब्ध आहेत. ही SUV मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गिअरबॉक्समध्ये मिळते. शहरातील वाहतूक असो किंवा हायवेवरील प्रवास, दोन्ही ठिकाणी Victoris चा ड्रायव्हिंग अनुभव स्मूद आहे. AWD (ऑल-व्हील ड्राइव्ह) पर्यायामुळे हलक्या ऑफ-रोड रस्त्यांवरही ही SUV भक्कम साथ देते.
4 / 5
मायलेजच्या बाबतीत Victoris आपल्या सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, याचे पेट्रोल व्हेरिएंट: सुमारे 21 kmpl, हायब्रिड व्हेरिएंट: 28.65 kmpl आणि CNG व्हेरिएंट: सुमारे 26 km/kg चे मायलेज देते. उच्च मायलेजमुळे ही SUV रोजच्या वापरासाठी अत्यंत किफायतशीर ठरते.
5 / 5
Victoris मध्ये मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पॅनोरमिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग, 360 डिग्री कॅमेरा, कनेक्टेड कार टेक्नोलॉजीसारखे आधुनिक फीचर्स मिळतात. तसेच, सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्स, लेव्हल-2 ADAS आणि Bharat NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग देण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही SUV फॅमिली कार म्हणून मजबूत पर्याय ठरते.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीcarकारAutomobileवाहन