Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीबाबत नितीन गडकरींची मोठी माहिती, संसदेत बोलताना म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 21:10 IST
1 / 10 नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज संसदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान 'इलेक्ट्रिक वाहने आणि चार्जिंग स्टेशन्स' या विषयावर महत्वाची प्रतिक्रिया दिली. 2 / 10 मी आश्वासन देतो की, येत्या दोन वर्षांत इलेक्ट्रिक दुचाकी, इलेक्ट्रिक तीन चाकी आणि इलेक्ट्रिक चार चाकी वाहनांची किंमत पेट्रोल वाहनांच्या बरोबरीने होईल, अशी महत्वाची माहिती गडकरींनी दिली.3 / 10 संसदेत बोलताना गडकरी म्हणाले की, सध्या पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत. यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सहन करावे लागत आहे.4 / 10 22 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात साडेचार महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर वाढ करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या 10 दिवसांत नवव्यांदा गुरुवारी पुन्हा भावात वाढ करण्यात आली.5 / 10 संसदेच्या संकुलात चार्जिंग स्टेशन उभारल्यानंतर खासदार इलेक्ट्रिक वाहने खरेदी करू शकतात, असेही नितीन गडकरी म्हणाले. आयातीला पर्याय, किफायतशीर, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी उत्पादन हे सरकारचे धोरण असल्याची माहिती गडकरींनी दिली.6 / 10 ते पुढे म्हणाले की, ग्रीन हायड्रोजन, वीज, इथेनॉल, मिथेनॉल, बायो-डिझेल, बायो-एलएनजी आणि बायो-सीएनजी या पर्यायाकडे जावे लागेल. आपण या दिशेने काम करत आहोत.7 / 10 यावेळी गडकरींनी संसदेच्या सर्व पार्किंगच्या ठिकाणी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याची विनंती गडकरींनी सभापती ओम बिर्ला यांना केली.8 / 10 गडकरी पुढे म्हणाले की, चार्जिंग स्टेशनच्या संदर्भात देशात चांगला विकास झाला आहे. ऊर्जा मंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पायाभूत सुविधा जारी केल्या आहेत. देशातील ई-मोबिलिटीला गती देण्यासाठी सुधारित एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे आणि मानके तयार करण्यात आली आहेत.9 / 10 ते पुढे म्हणाले की, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) प्रत्येक 40 किमीवर रस्त्याच्या कडेला चार्जिंगची सुविधा विकसित करत आहे. त्यासाठी सौर किंवा पवन ऊर्जा वापरण्याचा प्रयत्न आहे. 10 / 10 NHAI ने आधीच 39 सुविधा सुरू केल्या आहेत आणि अशा 103 सुविधा बोलीच्या टप्प्यात आहेत. 600 हून अधिक साइट्स ओळखल्या गेल्या आहेत आणि लवकरच त्यासाठी बोली सुरू केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.