शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Driving License New Rules: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याचे नियम बदललेत; जाणून घ्या होईल फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 15:46 IST

1 / 8
नवी दिल्ली : गाडी शिकणाऱ्यांसाठी व चालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हाला यापुढे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) फेऱ्या मारण्याची, लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही. केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचे नियम अतिशय सोपे केले आहेत.
2 / 8
ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये केलेल्या सुधारणांनुसार, आता तुम्हाला आरटीओमध्ये जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही. हे नियम केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचित केले आहेत, हे नियम लागू देखील झाले आहेत. यामुळे ते ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओच्या वेटिंग लिस्टमध्ये पडून असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.
3 / 8
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी ओरओटीमध्ये टेस्टची वाट पाहावी लागणार नाही. तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. यासाठी ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि त्याठिकाणी टेस्ट उत्तीर्ण करावी लागेल. तसेच ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून अर्जदारांना सर्टिफिकेट दिले जाईल. या सर्टिफिकेटच्या आधारे, अर्जदाराचा ड्रायव्हिंग लायसन्स जारी केला जाईल.
4 / 8
ट्रेनिंग सेंटर्सबाबत रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून काही मार्गदर्शक तत्त्वे आणि अटीही आहेत. ज्यामध्ये ट्रेनिंग सेंटर्सच्या क्षेत्रापासून ते प्रशिक्षकाच्या शिक्षणापर्यंतचा समावेश आहे. त्याबद्दल जाणून घेऊया...
5 / 8
1. अधिकृत एजन्सी हे सुनिश्चित करेल की दुचाकी, तीन चाकी आणि हलकी मोटार वाहनांसाठी निंग सेंटर्सकडे किमान एक एकर जागा आहे, मध्यम आणि जड प्रवासी मालवाहू वाहने किंवा ट्रेलरसाठी निंग सेंटर्ससाठी दोन एकर जागा आवश्यक आहे.
6 / 8
2. ट्रेनर किमान 12 वी पास असावा आणि त्याला किमान पाच वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा, त्याला वाहतूक नियमांचे चांगले ज्ञान असावे.
7 / 8
3. मंत्रालयाने एक अध्यापन अभ्यासक्रम देखील विहित केला आहे. हलकी मोटार वाहने चालवण्यासाठी, कोर्सचा कालावधी कमाल 4 आठवडे 29 तासांपर्यंत असेल. या ड्रायव्हिंग सेंटर्सचा अभ्यासक्रम 2 भागांमध्ये विभागला जाईल. थेअरी आणि प्रॅक्टिकल.
8 / 8
4. लोकांना मूलभूत रस्ते, ग्रामीण रस्ते, महामार्ग, शहरातील रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग, चढ-उतार इत्यादींवर गाडी चालवायला शिकण्यासाठी 21 तास घालवावे लागतात. थेअरीचा भाग संपूर्ण अभ्यासक्रमाच्या 8 तासांचा असेल, त्यात रस्ता शिष्टाचार समजून घेणे, वाहतूक शिक्षण, अपघातांची कारणे समजून घेणे, प्रथमोपचार आणि वाहन चालवण्याची इंधन कार्यक्षमता यांचा समावेश असेल.
टॅग्स :Automobileवाहन