शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 14:54 IST

1 / 7
नव्वदीच्या दशकात स्कूटर बनवून धुमाकुळ घालणारी कंपनी कायनेटीकने इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली आहे. कायनेटीकची लुना ही ईलेक्ट्रीक स्कुटर आधीपासूनच बाजारात आहे. अशातच थोडासा मॉडर्न लुक देऊन कंपनीने बजाजच्या चेतकच्या पावलावर पाऊल ठेवण्यास सुरुवात केली आहे. जुने नाव, डिझाईन पुन्हा वापरून कायनेटीक पुन्हा एकदा भारतीय बाजारात हात आजमावून पाहणार आहे.
2 / 7
जवळपास ४१ वर्षांपूर्वी कायनेटीकने होंडासोबत भागीदारी करत कायनेटीक डीएक्स लाँच केली होती. आता त्या नावाला ईव्ही जोडून नव्या जमान्याची स्कूटर लाँच करण्यात आली आहे. DX प्रकाराची किंमत १,११,४९९ रुपये आहे, तर DX+ ची किंमत १,१७,४९९ रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.
3 / 7
कायनेटीक डीएक्स ईव्हीचे डिझाईन मॉडर्न करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतू, एवढेही खास दिसत नाहीय. याचा फटका कंपनीला बसण्याची शक्यता आहे. कायनेटिक डीएक्समध्ये एक विशेष एलईडी हेडलाइट देण्यात आली आहे, ज्याच्या दोन्ही बाजुला के आकाराचा इंडिकेटर देण्यात आला आहे. तर खाली के आकारात डे टाईम रनिंग लाईट देण्यात आली आहे. लाल, निळा, काळा, पांढरा आणि चंदेरी अशा पाच रंगात ही स्कूटर उपलब्ध असणार आहे.
4 / 7
कायनेटिक ग्रीनने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये २.६ किलोवॅट क्षमतेचा लिथियम आयर्न फॉस्फेट (एलएफपी) बॅटरी दिलेली आहे. एका चार्जमध्ये ११६ किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज मिळते असा दावा कंपनीने केला आहे. ही बॅटरी २ तासात ५०%, ३ तासात ८०% आणि पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ४ तास घेते.
5 / 7
या स्कुटरमध्ये फुटबोर्डवर बॅटरी असल्याने व मागील चाकातच हब मोटर असल्याने बुटस्पेस ३७ लीटरची देण्यात आली आहे. इथे स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी टाईप सी पोर्टही देण्यात आला आहे. इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीवर ३ वर्षे किंवा ३०,००० किमी एवढी कंपनीची वॉरंटी असून ती ९ वर्षांपर्यंत वाढविता देखील येणार आहे.
6 / 7
ही स्कूटर चावीऐवजी, पासवर्ड प्रोटेक्शन लॉक आणि अनलॉक सुविधेने युक्त असेल. म्हणजेच याचा डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर असेल. तसेच ज्यांना चावीची गरज आहे त्यांना चावी देखील दिली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.
7 / 7
चार्जिंग पोर्टच नाही तर चार्जिंग किटच स्कूटरमध्ये फिट करण्यात आले आहे. पुढील भागातील थ्री पिन काढून वायर ओढून तुम्हाला सॉकेट (16A) मध्ये बसवायचे आहे. बंद करताना ही वायर आरामात आतमध्ये जाते.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर