1 / 10देशात सध्या कार निर्माता कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा लागलेली आहे. लक्झरी कारमधील फिचर्स आता छोट्या छोट्या कारमध्ये मिळू लागली आहेत. याचबरोबर कारचे सस्पेंशनही चांगले देऊ लागली आहेत. नुकतीच एक अशी कार लाँच झाली आहे जिच्या जाहिरातमीमध्ये कारमधील एक महिला स्पीडब्रेकरवरून कार जात असताना आरामात लिपस्टिक लावत आहे. 2 / 10कारमध्ये सस्पेन्शन चांगले असल्याने रस्त्यांवरील खड्डे आणि दगड धोंडे यांचा परिणाम आतमध्ये जाणवत नाही. यामुळे वाहन चालविताना देखील त्रास होत नाही. परंतू हेच सप्सेंन्शन जर खराब झाले तर तुम्हाला या खड्ड्यांचा त्रास होणार आहे. कारचे सस्पेन्शन खूप काळ चांगले ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. चला जाणून घेऊया...3 / 10जर तुमच्या कारमध्ये पाचच व्यक्ती बसू शकतात तर त्यामध्ये जास्त लोक बसवून आणखी डिक्कीमध्ये साहित्य ठेवू नये. यामुळे वजन जास्त होऊन तुमच्या कारचे सस्पेंन्शन खराब होऊ शकते. 4 / 10तसेच जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त साहित्य (लगेज) कारमध्ये ठेवून प्रवास करत असाल तरीदेखील सस्पेंश्न खराब लवकर खराब होण्याची शक्यता आहे. तसेच कार चालविण्य़ासही त्रास होतो. इंधनही जास्त जळते. 5 / 10सस्पेंशन म्हणजे फक्त शॉकऑब्झर्व्हर नाही, तर त्याच्या बरोबर अन्य प्रणालीदेखील असते. एक शॉकऑब्झर्व्हर 1000 -2000 रुपयांना असतो. परंतू त्याच्यासोबत लागणारे जे साहित्य किंवा सुटे भाग असतात त्यांचा बदलण्यासह कामाचा खर्च हा 20 ते 30 हजारांच्या आसपास होतो. यामुळे खिशाला भार न पडण्यासाठी ही काळजी घेणे गरजेचे आहे. 6 / 10कारचे सस्पेन्शन दीर्घ काळ ठीक राहण्यासाठी तुमची कार कच्चे रस्ते, खराब रस्त्यांवरून कार चालविणे टाळायला हवे. अनेकदा टोल रोड वाचविण्यासाठी लोक हायवेवरून न जाता त्याला पर्यायी मार्ग असलेल्या गावांतून जातात. हे रस्ते खराब असतात. यामुळे कारचे सस्पेंन्शन खराब होते. 7 / 10काही रुपयांचा टोल वाचविण्यासाठी वेळ लागत असला तरीदेखील आणि इंधन जास्त जात असले तरीदेखील लोक हा मार्ग निवडतात. असा प्रकार नेहमी केल्याने किंवा वारंवार खराब रस्त्यांचा वापर केल्याने कारचे सस्पेन्शन लवकर खराब होते. यामुळे ऑफ रोडिंग आणि खराब रस्त्यांऐवजी थोडा लांबचा का होईना चांगला रस्ता निवडावा. 8 / 10काही घडले किंवा खड्डा दिसला की झटकन ब्रेक दाबण्याची प्रक्रिया ही सामान्यपणे केली जाते. जादातर लोक अचानक कार थांबवतात, यासाठी वेगात असताना जोरात ब्रेक दाबतात. यामुळे सस्पेन्शनवर दाब पडतो. 9 / 10असा प्रकार वारंवार घडू लागल्याने कारचे सस्पेन्शन लवकर कमजोर पडते. तसेच ऑफ रोडिंगवेळी अचानक ब्रेक लावल्यास सस्पेन्शन तुटण्याची शक्यताही जास्त असते. 10 / 10यामुळे नेहमी लक्षात असू द्यावे तसाच मोठा प्रसंग असेल तरच जोरात ब्रेक लावावेत. अन्यथा एखादे वळण आले किंवा स्पीडब्रेकर आला तर आधीपासूनच कार हळू करावी. ब्रेक पॅड झिजले तर सस्पेन्शन बदलण्याएवढा खर्च काढत नाही.