Maruti पासून TATA पर्यंत, पुढील आठवड्यात लाँच होणार ‘या’ जबरदस्त कार्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 09:45 IST
1 / 8नव्या तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या कारची वाट पाहणाऱ्या लोकांसाठी पुढचा आठवडा चांगलाच असणार आहे. हायब्रीड ते इलेक्ट्रीक आणि फ्लेक्स इंजिन अशा तीन उत्तम गाड्या पुढील आठवड्यात बाजारात दाखल होणार आहेत. सणासुदीच्या आधी, सर्व कार कंपन्या आपली नवीन मॉडेल्स लाँच करून संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 2 / 8मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि टोयोटा पुढील आठवड्यात आपल्या नव्या कार्स लाँच करणार आहे. त्यामुळे नव्या कारच्या खरेदीसाठी प्रतीक्षा करत असलेल्या लोकांसाठी पुढील आठवडा पर्वणी ठरण्याची शक्यता आहे. पाहूया पुढील आठवड्यात कोणत्या कार्स होणार लाँच.3 / 8Maruti Grand Vitara: पुढील आठवड्यात लाँच होणाऱ्या कार्सपैकी पहिली कार म्हणजे मारूती ग्रँड विटारा. मारुतीच्या या बहुप्रतीक्षीत एसयुव्ही कारचं बुकींग यापूर्वीच सुरू करण्यात आलं आहे. कंपनीला आतापर्यंत या कारच्या 55 हजारांपेक्षा अधिक बुकिंग्सही मिळाल्यात. या महिन्याच्या अखेरिस कंपनी कार्सच्या किंमतीचा खुलासा करेल.4 / 8मारुतीची ही कार हायब्रिड टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. काही व्हेरिअंट्सचा वेटिंग पिरिअड आताच पाच ते सहा महिन्यांच्या वर गेला आहे. कंपनी ही कार सिग्मा, डेल्टा, झेटा, अल्फा, झेटा प्लस आणि अल्फा प्लस या व्हेरिअंटमध्ये लाँच करणार आहे. यामध्ये टोयोटा हायरायडर सारखे फीचर्स असतील. तसंच कंपनी यात आणखी काही फीचर्सही देऊ शकते असं म्हटलं जातंय.5 / 8Tata Tiago EV: इलेक्ट्रीक वाहनांच्या बाजारपेठेबद्दल बोलायचं झाल्यास, टाटा मोटर्सचं भारतीय बाजारपेठेत वर्चस्व आहे. टाटा मोटर्सच्या Tata Nexon इलेक्ट्रीकला मोठं यश मिळालं आहे. कंपनी आता ग्राहकांना SUV बरोबरच हॅचबॅकमध्ये EV चा पर्याय देणार आहे. 28 सप्टेंबर रोजी, Tata Motors Tiago EV लाँच करणार आहे, जी कंपनीची तिसरी इलेक्ट्रीक कार असेल.6 / 8या कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे 10 लाख रुपये असू शकते असे मानले जात आहे. टियागोचे बहुतांश फीचर्स यातही असतील अशी अपेक्षा आहे. कंपनी त्यात अॅडजस्टेबल रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम आणि क्रूझ कंट्रोल देखील देऊ शकते.7 / 8Toyota Camry Flex Fuel: 28 सप्टेंबर रोजी टोयोटाचीदेखील एक नवी कार लाँच होणार आहे. टोयोटाची ही कार अत्याधुनिक फ्लेक्स इंजिनवर बेस्ड असेल. टोयोटा कॅमरी फ्लेक्स फ्युअलबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. परंतु याच्या फीचर्स बद्दल आणि किंमतीबद्दल लाँचनंतरच माहिती मिळू शकते.8 / 8फ्लेक्स फ्युअल इंजिन असलेल्या कार्स एकापेक्षा अधिक प्रकारच्या इंधनावर चालतात. अशा कारमध्ये पेट्रोलशिवाय इथेनॉलचा वापरही केला जाऊ शकतो. पर्यावरणाच्या दृष्टीनं या कार्स अनुकूल मानल्या जातात. तसंच या चालवण्याचा खर्चही पेट्रोलच्या तुलनेनं कमी असतो.