1 / 6जगप्रसिद्ध कंपनी BMW ने X5 2019 नवे मॉडेल लाँच केले असून या एसयुव्हीची सुरुवातीची किंमत 72.90 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या लाँचिंगचे आकर्षण म्हणजे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यावेळी उपस्थित होता. यंदा बीएमडब्ल्यूचे 12 नवीन मॉडेल लाँच केले जाणार आहेत. 2 / 62019 BMW X5 दोन डिझेल मॉडेल्समध्ये लाँच करण्यात आली. यामध्ये BMW X5 xDrive30d Sport आणि BMW X5 xDrive30d xLine या दोन कारचा सहभाग आहे. या कारचे पेट्रोल व्हर्जनही BMW X5 xDrive 40i M Sport 82.40 लाख रुपयांना लाँच करण्यात आले आहे. पेट्रोल मॉडेलची विक्री काही महिन्यांनी सुरु केली जाणार आहे. 3 / 62019 BMW X5 मध्ये 3.0 लीटर टर्बो डिझेल मोटर देण्यात आली आहे. हे इंजिन 261 बीएचपी ताकद आणि 620 एनएम पीक टॉर्क देते. 4 / 6बीएमडब्ल्यूची ही आतापर्यंतची सर्वात मोठी X5 कार आहे. हे चौथे जनरेशन जुन्या मॉडेलच्या तुलनेत 35 मिलीमीटर लांब, 32 मिलीमीटर रुंद आणि 11 मिलीमीटर उंच आहे. तसेच पुढील-मागील चाकांमधील अंतरही 42 मिलीमीटर वाढविण्यात आले आहे. बूट स्पेस 645 लीटर्स आहे. सीट दुमडल्यावर 1,640 लीटर्सची जागा मिळते.5 / 6या कारची केबिनमध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल देण्यात आला आहे. BMW Live Cockpit Professional डिस्प्ले म्हणतात. floating इंफोटेनमेंट स्क्रीन, iDrive सोबत Apple CarPlay आणि Android Auto मिळतो.6 / 64-झोन क्लाइमेट कंट्रोल, वायरलेस चार्जिंग, पाठीमागील पॅसेंजरसाठी स्क्रीन, पॅनॉरोमिक सनरूफ, वेलकम कार्पेट लाइट, रिवाइज्ड गियर-सिलेक्टर लिव्हर देण्यात आला आहे.