शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बोलेरो ते स्कॉर्पियोपर्यंत 'महिंद्रा'च्या कारवर मिळतोय मोठा डिस्काऊंट, जाणून घ्या डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 15:19 IST

1 / 7
जर तुम्ही नवी एसयूव्ही किंवा एमपीवी कार घेण्याचा विचार करत असाल तर नक्कीच महिंद्राचा विचार करू शकता. महिंद्राच्या XUV300 कारवर कंपनीकडून तब्बल ३० हजार रुपयांची रोख सूट दिली जात आहे.
2 / 7
Mahindra XUV 300 कारच्या व्हेरिअंटनुसार त्यावरील सूटमध्ये बदल होतो. तसंच २५ हजार रुपयांचा एक्स्चेंज बोनस आणि ४ हजार रुपयांच्या कॉर्पोरेट सूटसह १० हजार रुपयांपर्यंत फ्री एक्सेसरीजची ऑफर कंपनीकडून देण्यात येत आहे.
3 / 7
महिंद्रा बोलेरो कारवर रोख सूट नसली तरी ६ हजार रुपयाच्या एक्सेसरीज मोफत दिल्या जात आहेत. तसंच १५ हजार रुपयांचा एक्स्जेंच बोनस आणि ३ हजार रुपयांचा कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. बोलेरो नियोवर २० हजार रुपयांचा एक्चेंज बोनस आणि ४ हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट उपलब्ध आहे.
4 / 7
Mahindra Thar वर सध्या कोणतीही अधिकृत सूट उपलब्ध नाही. पण स्कॉर्पियो कारवर मेकर १५ हजार रुपयांचा एक्स्जेंच बोनस दिला जात आहे. याशिवाय ४ हजार रुपये कॉर्पोरेट आणि १५ हजार रुपयांपर्यंतच्या एक्सेसरीज मोफत दिल्या जात आहेत.
5 / 7
Mahindra Marazoo चा विचार करायचा झाल्यास M2 ट्रीमवर २० हजार रुपये आणि M4 प्लस आणि M6 प्लस ट्रिमवर १५ हजार रुपयांचा रोख डिस्काऊंट दिला जात आहे. तसंच ५२०० रुपयांचा एक्स्चेंज बोनस देखील उपलब्ध आहे.
6 / 7
XUV700 वर या महिन्यात कोणतीही अधिकृत सूट किंवा डील उपलब्ध नाही. पण महिंद्राची खास एसयूव्ही अल्टुरसवर २.२ कोटींची रोख सूट आणि ५० हजार रुपयांचा एक्स्चेंज बोनस मिळत आहे.
7 / 7
महिंद्रांच्या अल्टुरस एसयूव्हीवर ११,५०० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट आणि २० हजार रुपयांपर्यंतच्या मोफत एक्सेसरीज देखील दिल्या जात आहेत.
टॅग्स :Mahindraमहिंद्राAutomobileवाहन