शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 20:24 IST

1 / 5
१) मारुती सुझुकी अल्टो के १०: ही बजेट कार सीएनजी सेगमेंटमधील सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय मॉडेलपैकी एक आहे. अल्टो के १० मध्ये १-लिटर, ३-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. सीएनजी मोडवर चालताना, हे इंजिन ४१ पीएस पॉवर आणि ६० एनएम टॉर्क निर्माण करते. या कारची एक्स शोरूम किंमत ४ लाख ८१ हजार ९०० रुपये इतकी आहे. ही कार ३१.५९ किमीपर्यंत मायलेज देते.
2 / 5
३) मारुती सुझुकी सेलेरियो: उत्कृष्ट इंधन कार्यक्षमतेसाठी सेलेरियोची गणना केली जाते. यात K10C ड्युअलजेट १.०-लिटर सिंगल-सिलेंडर पेट्रोल इंजिन वापरले आहे, जे ६६ एचपी आणि ८९ एनएम टॉर्क निर्माण करते. ही कार ५ लाख ९७ हजार ९०० रुपयांच्या एक्स शोरूम किंमतीत बाजारात उपलब्ध असून एक किलो सीएनजीमध्ये ३५.६० किमीपर्यंत मायलेज देते.
3 / 5
५) मारुती सुझुकी डिझायर: सेडान सेगमेंटमध्ये डिझायर सीएनजी हा एक मजबूत पर्याय आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणि टॅक्सी व्यवसायासाठी ही कार लोकप्रिय आहे, कारण तिचे मायलेज (३३.७३ किमी/किलो) उत्कृष्ट आहे. या कारची एक्स शोरूम किंमत ८ लाख ०३ हजार १०० रुपये आहे.
4 / 5
४) मारुती सुझुकी स्विफ्ट: स्पोर्टी लूक आणि चांगल्या कार्यक्षमतेसाठी ओळखली जाणारी स्विफ्ट सीएनजीमध्येही उपलब्ध आहे. कंपनीने यात १.२-लिटर ३-सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड Z-सिरीज पेट्रोल इंजिन वापरले आहे. या कारची किंमत ७ लाख ४४ हजार ९०० रुपये (एक्स-शोरूम) आहे, जी ३५.६० किमी मायलेज देते.
5 / 5
२) मारुती सुझुकी वॅगनआर: वॅगनआर ही गेल्या काही महिन्यांपासून मारुतीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. १.०-लिटर आणि १.२-लिटर पेट्रोल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध असलेली ही हॅचबॅक सीएनजीमध्ये उत्कृष्ट मायलेज देते. दरम्यान, ३४.०५ मायलेज देणाऱ्या या कारची एक्स- शोरूम किंमत ५ लाख ८८ हजार ९०० रुपये आहे.
टॅग्स :carकारMarutiमारुतीAutomobileवाहन