चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 14:36 IST
1 / 5Baba Banga Predictions in Marathi: तीन महिन्यानंतर 2026 वर्ष सुरू होईल. या वर्षांमध्ये काय काय घडू शकते. याबद्दल बाबा वेंगाने केलेल्या भविष्यवाणीची चर्चा सुरू झाली आहे. बाबा वेंगाच्या अनुयायानी सांगितल्या प्रमाणे २०२६ या वर्षात काही मोठ्या घडामोडी घडू शकतात.2 / 5बाबा वेंगाने अशी भविष्यवाणी केलेली आहे की, २०२६ मध्ये जगात तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडेल. जगाच्या पूर्वेकडून हे युद्ध सुरू होईल आणि पश्चिमेपर्यंत पोहोचू शकतं. या युद्धामुळे पश्चिमेकडील देशाचे नुकसान होईल आणि राष्ट्रपती पुतीन जगातील शक्तिशाली नेता म्हणून पुढे येतील, अशी भविष्यवाणी केली आहे. 3 / 5बाबा वेंगाने केलेली दुसरी भविष्यवाणी म्हणजे २०२६ मध्ये एलियन्ससोबत माणसाचा संपर्क होऊ शकतो. दुसऱ्या ग्रहावरून २०२६ मध्ये भले मोठे यान पृथ्वीवर येईल.4 / 5सध्या सगळीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला आहे. याबद्दलही बाबा वेंगाने आधीच भविष्यवाणी करून ठेवलेली आहे. २०२६ मध्ये एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रचंड विकसित झालेले असेल आणि माणसांचं आयुष्यही एआय नियंत्रित करणे सुरू करेल. नोकरीपासून खासगी वापरापर्यंत एआयचा वापर वाढेल.5 / 5बाबा वेंगाने २०२६ मध्येही नैसर्गिक संकट येतील, असे भविष्य वर्तवले आहे. भूकंप, ज्वालामुखींचा उद्रेक, हवामान बदल होतील. नैसर्गिक संकटांमुळे पृथ्वीवरील ७ ते ८ टक्के जमीन प्रभावित होईल. मोठ्या प्रमाणात विध्वंस होईल.