By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 16:28 IST
1 / 13अहमदनगर जिल्ह्यात ३ हजार २८ कोटींच्या महामार्गाचं भूमीपूजन तर १ हजार ४६ कोटींच्या महामार्गाचं लोकार्पण झालं. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विखे परिवार एकाच मंचावर उपस्थित होते. 2 / 13अहमदनगरमधील विकासकामांचा लोकार्पण सोहळा पवार-गडकरी जोडीमुळे लक्षवेधी ठरला. त्यानंतरही, शरद पवार यांच्या पारनेर दौऱ्यामुळे हा सोहळा चर्चेचा विषय बनला आहे. 3 / 13पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे साधे राहणीमान आणि साधे घर नेहमीच चर्चेत राहिले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनीही लंके यांच्या पारनेर तालुक्यातील हंगा येथील घराला भेट दिली. 4 / 13 आमदार लंके यांनी कोरोना काळात केलेले काम देशपातळीवर चर्चेत आले होते. तसेच लंके यांचा साधेपणा, त्यांचे साधे घर यावरही चर्चा झाली होती. शरद पवार यांनी थेट लंके यांच्या 2 खोल्यांच्या घरी भेट दिली. 5 / 13पवारांच्या या भेटीमुळे कार्यकर्तेही भारावले. लंकेच्या अत्यंत साध्या घरात पवार गेल्यामुळे कार्यकर्त्यांच्या आनंदालाही उधाण आले होते. लंकेच्या घरात शरद पववार होते, तर दारात कार्यकर्त्यांच मोठी गर्दी जमा झाली होती. 6 / 13पवार यांच्या बाजुला आमदार लंके यांचे आई-वडिल होते, त्यांचीही पवार यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी लंके यांच्या मुलीनेही शरद पवार यांच्याशी संवाद साधला. 7 / 13लंकेंच्या मुलांना त्यांच्या शिक्षणाबाबत पवारांनी विचारपूस केली. यावेळी, कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार रोहित पवार हेही हजर होते. पवार यांच्या या दौऱ्यामुळे आमदार लंकेचं जिल्ह्याच्या राजकारणातील वजन चांगलंच वाढलय. 8 / 13निलेश लंके यांच्याविरुद्ध महिला तहसिलदाराने आरोप केले होते, त्यावरुन भाजपा नेत्या चित्रा वाघ सातत्याने लंकेंना टार्गेट करत आहेत. तर, यापूर्वी स्थानिक मनसेच्या नेत्यानेही आमदार लंकेंविरुद्ध तक्रारी केल्या होता. 9 / 13शरद पवार यांनी लंकेच्या घरी भेट देत एकप्रकारे लंके आपल्या किती जवळचे कार्यकर्ते आहेत, हेच दाखवून दिलंय. त्यामुळे, नगरमध्ये राष्ट्रवादीचा मोठा चेहरा म्हणूनही आता लंकेकडे पाहिल्यास नवल वाटता कामा नये10 / 13पवारांची ही भेट नगर जिल्ह्यासाठी आणि पारनेरसाठी लक्षवेधी ठरली. लंकेच्या छोट्याशा घराबाहेर मोठा फौजफाटा आणि लोकांचा मेळाच जमला होता. 11 / 13पवारांचे फोटो काढण्यासाठी, गर्दीत एखादा सेल्फी घेण्यासाठीही अनेकांची धडपड दिसून येते होती. पण, पवार यांनी लंकेंच्या घरी सर्वांचीच विचारपूस केली, अधिक वेळही व्यतीत केला. 12 / 13या दौऱ्यात नगरचे पालकमंत्री हसन मुश्रिफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार रोहित पवार यांसह राष्ट्रवादीचे दिग्गज नेतेही उपस्थित होते. 13 / 13नगर जिल्ह्यात नेहमीच पवार विरुद्ध विखे पाटील असा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला आहे. त्यातच, पवारांनी आता सर्वसामान्य आणि कुठलिही राजकीय पार्श्वभूमी नसलेला चेहरा जिल्ह्यातून पुढे आणल्याचेच या दौऱ्यातून दिसून येईल.