शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना बिस्कीट आणण्यासाठी पाठवून जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाचा गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 16:23 IST

गंगाखेड तालुक्यातील धारासुर तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील खळबळजनक घटना

सोनपेठ (परभणी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कार्यालयातच शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गंगाखेड तालुक्यातील धारासुर तांडा जि.प. प्राथमिक शाळेत घडली. शाळेच्या कार्यालयातच शिक्षकाने गळफास घेतल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांत खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सोनपेठ पोलीस करत आहेत.

गंगाखेड तालुक्यातील धारासुर तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक विठ्ठल रत्नपारखे ( 45, रा. गंगाखेड ) आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शाळेत आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना रत्नपारखे यांनी बिस्कीट आणण्यासाठी गावातील किराणा दुकानावर पाठवले. त्यानंतर शाळेच्या कार्यालयातील छताला असलेल्या  लोखंडी हुकला नायलॉनच्या पांढऱ्या पट्टीने गळफास घेतला. 

दरम्यान, काही वेळाने अन्य शिक्षक आणि विद्यार्थी तेथे दाखल झाली. शिक्षकांनी याची माहिती ग्रामस्थांना दिली. धारासुर येथील सरपंच राजेभाऊ गवळे व गंगाधर (आबा ) कदम यांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात सदर माहिती दिली. घटनेची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक मंचकराव फड, पो.ना. प्रभाकर बाजगीर, पो.ना. मनोज राठोड, चालक गणेश नाटकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी केंद्रप्रमुख विठ्ठलप्रसाद पवार, शिक्षक साहेबराव राठोड, गोविंद रोडे, सुशील थडवे यांच्या समक्ष पंचनामा करत विठ्ठल रत्नपारखे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात हलविला. या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह धारासुर ग्रामस्थांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक