शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

येलदरी, खडकपूर्णा अन सिद्धेश्वर धरणे तुडूंब; पूर्णा नदीपात्रात विसर्ग वाढल्याने धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 18:38 IST

मागील दोन दिवसांपासून पूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.

येलदरी ( परभणी) : पूर्णा नदीवरील तिन्ही धरणे तुडुंब भरली आहे. खडकपूर्णाचे 19, येलदरीचे 10 तर सिद्धेश्वरचे 14 दरवाजे उघडून विसर्ग सुरु आहे. त्यामुळे पूर्णा नदीला मोठा पूर आला असून नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

मागील दोन दिवसांपासून पूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. येलदरी धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे आज धरणाची सकाळी चार दरवाजे, दुपारी 6 दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र खडकपूर्णा धरणाच्या 19 दरवाज्यातून 44 हजार 408 क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले. येलदरी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून 32 हजार 768 क्यूसेक्स विसर्ग पूर्णा नदी पात्रात सोडला. विसर्ग वाढल्याने पूर्णा नदी काठच्या गावांना पाटबंधारे विभागाचे अधिकारी बी के  शिंदे ,खडकपूर्णा प्रकल्पाचे प्रकल्प निरीक्षक राहुल गुंजाळ  यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

दरम्यान, खडकपूर्णा आणि येलदरी धरणातून प्रचंड प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने सिद्धेश्वर धरणाचा साठा वाढला आहे. सिद्धेश्वरचे सर्व 14 दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पूर्णा नदीला महापूर आला आहे. पूर्णा प्रकल्पाचे ही तिन्ही धरणे मागील चार वर्षांपासून तुडुंब भरत आहेत. त्यामुळे भविष्यातील पाणी टंचाईच्या समस्या दूर होणार असल्याने  नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरण