शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाळूच्या गगनाला भिडलेल्या दरामुळे ‘पारधी आवास’ची कामे संथ गतीनेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 20:13 IST

जिल्ह्यात वाळूच्या गगनाला भिडलेल्या दराचा घरकुल बांधकामावर परिणाम होत असून याचा फटका पारधी आवास योजनेलाही बसत आहे.

परभणी : जिल्ह्यात वाळूच्या गगनाला भिडलेल्या दराचा घरकुल बांधकामावर परिणाम होत असून याचा फटका पारधी आवास योजनेलाही बसत आहे. जिल्ह्यात दोन वर्षामध्ये ३८ घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होेते; परंतु, बोटावर मोजण्याऐेवढीच घरकुलाची कामे पूर्ण झाली आहेत.

शासनाच्या वतीने सर्वांना घर उपलब्ध व्हावे, यासाठी पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना राबविण्यात येते. चार टप्प्यात लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी अनुदान देण्यात येते. जिल्ह्यात पारधी आवास योजनेंतर्गत २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षांमध्ये अनुक्रमे २० व १८ घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यातील लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ताही वितरित करण्यात आला आहे. २०१६-१७या वर्षातील लाभार्थ्यांना तर अनुदानाचे तीन हप्ते देण्यात आले आहेत. मात्र बोटावर मोजण्याएवढीच घरकुलाची कामे पूर्ण झाली आहेत. दोन वर्षापासून जिल्ह्यात वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत. 

घरकुल बांधकामासाठी मिळणारी रक्कम व बांधकामासाठी लागणारा खर्च यामध्ये ताळमेळ बसत नसल्याने  घरकुल बांधकाम पूर्ण होण्यास विलंब होत आहे. जिल्हा प्रशासनाने अल्प दारात घरकुल बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तहसील प्रशासनावर टाकली आहे. मात्र नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल तयार झाल्याने वाळू उपलब्ध होण्यास अडथळा निर्माण होत आहे. असे असले तरी पारधी आवास योजनेंतर्गत घरकुलाची कामे मात्र रखडली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 

पाठपुराव्याची आवश्यकताजिल्ह्यात २०१६-१७ या वर्षात जिंतूर तालुक्यातील २, मानवत १, पालम ६, परभणी २, पाथरी ३, पूर्णा  ४, सेलू, १ तर सोनपेठ तालुक्यातील १ अशा २० लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले. यातील जवळपास सर्वच लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. तर १३ लाभार्थ्यांना दुसरा, एका लाभार्थ्याला तिसरा हप्ता देण्यात आला आहे. तर चार घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. २०१७-१८ या वर्षामध्ये गंगाखेड तालुक्यातील ३, जिंतूर तालुक्यातील ५, परभणी तालुक्यातील २, पूर्णा तालुक्यातील १ तर सोनपेठ  तालुक्यातील ७ अशा १८ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले होते. यातील सर्वच लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता वितरित करण्याात आला आहे. मात्र घरकुल बांधकामासाठी प्रशासनाच्या वतीनेही पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीgovernment schemeसरकारी योजनाsandवाळू