२९ गावांचा कारभार महिलांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:12 AM2021-02-22T04:12:12+5:302021-02-22T04:12:12+5:30

पालम : तालुक्यात ग्रामीण भागात प्रत्येक गावाला विकासाची धुरा सांभाळण्यासाठी नवीन कारभारी मिळाला आहे. यात महिलांना पुरुषाच्या तुलनेत जास्त ...

Women are in charge of 29 villages | २९ गावांचा कारभार महिलांच्या हाती

२९ गावांचा कारभार महिलांच्या हाती

Next

पालम : तालुक्यात ग्रामीण भागात प्रत्येक गावाला विकासाची धुरा सांभाळण्यासाठी नवीन कारभारी मिळाला आहे. यात महिलांना पुरुषाच्या तुलनेत जास्त संधी मिळाली असून, २९ गावांचा कारभार महिलांच्या हाती सोपविण्यात आला आहे.

पालम तालुक्यात ६६ ग्रामपंचायती असून, यापैकी पहिल्या टप्प्यात ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ़झाल्या आहेत. यापैकी २६ गावांत महिलांना आरक्षण सोडत झाली होती. मात्र, यापैकी पेठशिवणी, फळा, उक्कडगाव व पेठपिंपळगाव या ४ गावांत महिलांना आरक्षित होऊनही संबंधित प्रवर्गातील महिला सदस्य नसल्याने या जागांवर आरक्षण बदलून त्याच प्रवर्गातील पुरुष वर्गाला संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुरुषांच्या आरक्षित जागेवरील महिलांना सरपंच पदाची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे ५३ ग्रामपंचायतींपैकी २९ गावांचा कारभार महिलांच्या हाती आला आहे.

Web Title: Women are in charge of 29 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.