शहरातील गौतम नगर परिसरातील दिपाली राजू कांबळे या २१ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरी असतांना बाहेरुन आलेल्या पती राजू कांबळे याने तू येणाऱ्या जाणाऱ्यांकडे का पाहत आहेस, असे म्हणून शिवीगाळ केली. तेंव्हा शिवीगाळ करू नका, असे म्हणताच पती राजू किरण कांबळे याने चापटा व लाथाने मारहाण करीत विटेच्या तुकड्याने मारून पत्नी दिपाली कांबळे हिचे डोकं फोडले.तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादीची आई लक्ष्मीबाई वाघमारे यांना ही शिवीगाळ करून तू आमचे भांडण सोडविण्यास आली तर तुलाही खतम करून टाकीन अशी धमकी दिल्याची फिर्याद दिपाली राजू कांबळे यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिल्यावरून राजू किरण कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास जमादार मारोती माहुरे करीत आहेत.
किरकोळ कारणावरून पत्नीचे डोके फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:16 IST