शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निंग वॉक करून परत येताना महिलेचे गंठण लांबविले

By राजन मगरुळकर | Updated: August 29, 2023 15:14 IST

आनंद नगर रस्त्याने व्यंकटेश नगरकडे जाणाऱ्या मार्गावर दुचाकीवर आलेल्या दोघांनी पळवले गंठन

परभणी : शहरातील आनंद नगर परिसरात मॉर्निंग वॉक वरून घरी परत येत असताना एका महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी बळजबरीने चोरून लांबविले. हा प्रकार सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी नवा मोंढा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यंकटेश नगर भागातील गृहिणी सुरेखा भगवानराव घुगे यांनी फिर्याद दिली. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे सुरेखा घुगे व त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सुनीता कातकडे या दोघी मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडल्या. काळी कमान, वसंतराव नाईक विद्यापीठ मार्गे भाजीपाला घेऊन वसमत रोडने आनंद नगरकडे त्या येत होत्या. आनंद नगर रस्त्याने व्यंकटेश नगरकडे जाणाऱ्या मार्गावर जाताना सकाळी सातच्या सुमारास दुचाकीवर दोघेजण त्यांच्यासमोरून आले. दुचाकी हळुवारपणे घेत घुगे यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या इसमाने हिसका मारून तोडले व दोघेही दुचाकीस्वार वसमत रोडकडे पळाले. यानंतर सुरेखा घुगे, सुनीता कातकडे यांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत चोरटे पळून गेले होते. दीड लाख रुपयांचे सोन्याचे गंठण लांबविल्याने नवा मोंढा ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुद्ध तक्रार देण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर कवाळे तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद