शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

परभणी, पूर्णा शहरांसाठी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:37 IST

परभणी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडले जाणार आहे. २१ डिसेंबर रोजी हे पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार असून साधारणत: दोन दिवसांमध्ये राहटी येथील बंधाºयात पाणी पोहचेल.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडले जाणार आहे. २१ डिसेंबर रोजी हे पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार असून साधारणत: दोन दिवसांमध्ये राहटी येथील बंधाºयात पाणी पोहचेल.परभणी शहराला राहटी बंधाºयातून पाणीपुरवठा होतो. या बंधाºयामध्ये सिद्धेश्वर प्रकल्पामधून पाणी घेतले जाते. मागील महिन्यात १ दलघमी पाणी सिद्धेश्वर प्रकल्पामध्ये घेण्यात आले. मात्र बंधाºयाच्या एका गेटची पाटी निघाल्याने अर्धे पाणी वाहून गेले होते.दोन दिवसांपूर्वी राहटी बंधाºयातील पाणी संपल्याने परभणी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेता महानगरपालिकेने जिल्हाधिकाºयांमार्फत पूर्णा पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी केली. मात्र पाणी उपलब्ध नसल्याचे कारण देत सिद्धेश्वरमधून पाणी देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पातून पाण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार परभणी शहर महापालिका आणि पूर्णा शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पाच्या जलाशयातून २१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेनंतर १२ क्युसेस पाणी दुधना नदीपात्रात सोडले जाणार आहे. साधारणत: दोन दिवसात पाणी राहटी बंधाºयात पोहचेल.या पाण्यामुळे परभणीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.नदीकाठावरील गावांना इशारा४नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने जिल्हाधिकाºयांनी नदीपात्रावरील गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. रहिवाशांनी अथवा शेतकºयांनी नदीपात्रात जावू नये किंवा आपली जनावरे नदीपात्रात जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. पाण्याचा उपसा करण्यासाठी विद्युत मोटारी बसविल्या असतील तर त्या सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन केले आहे. त्याच प्रमाणे नदीपात्रातील पाण्याचा उपसा होणार नाही, या अनुषंगाने कार्यवाही करावी, असे निर्देश तहसीलदारांना दिले आहेत.