शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी-पूर्णेसाठी पाणी: भर उन्हाळ्यात दुधनाचे पात्र भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:58 IST

जिल्ह्याचे तापमान एकीकडे ४० अंशापुढे गेले असताना परभणी व पूर्णा शहरासाठी निम्न दुधना प्रकल्पातून ८ दलघमी पाणी सोडण्यात आल्याने दुधना नदीचे पात्र तुडूंब भरले आहे. हे पाणी दुधनातून पूर्णा नदीत प्रवाही झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याचे तापमान एकीकडे ४० अंशापुढे गेले असताना परभणी व पूर्णा शहरासाठी निम्न दुधना प्रकल्पातून ८ दलघमी पाणी सोडण्यात आल्याने दुधना नदीचे पात्र तुडूंब भरले आहे. हे पाणी दुधनातून पूर्णा नदीत प्रवाही झाले आहे.परभणी व पूर्णा शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या दोन्ही शहरांना पूर्वी येलदरी धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु, गेल्या वर्षी येलदरी धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला नसल्याने निम्न दुधना प्रकल्पातून दुधना नदीच्या माध्यमातून या शहरांना पाणी दिले जात आहे. या अनुषंगाने १ एप्रिल रोजी निम्न दुधना प्रकल्पातून या दोन्ही शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ८ दलघमी पाणी १२०० क्युसेसने दुधना नदीपात्रात सोडण्यात आले. त्यामुळे सद्यस्थितीत दुधना नदीचे पात्र तुडूंब भरुन वाहू लागले आहे. हे पाणी दुधना नदीतून पूर्णा नदीत प्रवाही झाले असून ते परभणी- वसमत रस्त्यावरील राहटी येथील बंधाऱ्यातही दोन दिवसांपूर्वीच पोहचले. तेथून ते पूर्णा शहराजवळ असलेल्या बंधाºयातही पोहोचले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत दुधना बरोबरच पूर्णा नदीपात्रातही मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने या नदीकाठावरील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला आहे. शिवाय वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचीही सोय झाली आहे.नदीपात्रामध्ये केवळ पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले असल्याने या पाण्याचा व्यावसायिक वापर केला जाऊ नये, याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.परभणी शहरात दहा दिवसांआड पाणीपरभणी शहरासाठी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्यानंतर ते राहटी बंधाºयात पोहोचले आहे; परंतु, महानगरपालिकेची पाणी वितरणाची ढिसाळ व्यवस्था असल्याने शहरवासियांना किमान दहा दिवसांतून एक वेळा पाणी मिळत आहे. त्यामुळे शहरवासियांची पाण्यासाठी भटकंती कायम आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांमध्ये मनपाचे पाणी वितरणाचे दिवस कमी होण्याऐवजी वाढत असल्याचेच दिसून येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीTemperatureतापमानWaterपाणी