शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडसाठी दिग्रस बंधाऱ्यातून सोडले पाणी; पालम तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 17:04 IST

पात्रात पाणी शिल्लक नसल्याने गोदावरी काठचे वाळवंट होणार या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

ठळक मुद्देवीस दलघमी चा विसर्गगोदाकाठचे होणार वाळवंट

पालम (परभणी ) :  तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील दिग्रस बंधाऱ्यातून नांदेड शहरासाठी आज सकाळी सहा वाजता पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सकाळी 11 वाजेपर्यंत जवळपास 20 दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग झाला असून यामुळे येथील पात्रात आता केवळ गाळ शिल्लक राहिला आहे. पाणी शिल्लक नसल्याने गोदावरी काठचे वाळवंट होणार या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

पालम तालुक्यातील दिग्रस बंधाऱ्यातील पाण्याचासाठा नेहमीच गोदाकाठच्या गावांसाठी डोकेदुखी बनला आहे यावर्षी बंधाऱ्याच्या पात्रात 37 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा करण्यात आला होता या पैकी 25 दलघमी पाण्याचे आरक्षण करण्यात आले होते 22 डिसेंबर रोजी बंधाऱ्यात 26 दलघमी पाणीसाठा शिल्लक होता यापैकी नांदेड साठी 25 दलघमी पाणी सोडावे अशी मागणी करण्यात आली होती पण जिल्हाधिकारी शंकर यांनी पालम शहर व गोदाकाठावरील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी सहा दलघमी पाणीसाठा शिल्लक ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यामुळे नांदेड साठी 26 दलघमी पैकी 20 दलघमी पाणी सोडण्यात आले. आज सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी 16 दरवाजा पैकी नऊ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. 

परिसरातील शेतकऱ्यांवर संकट गोदावरीच्या पात्रात आता केवळ सहा दलघमीचा साठा शिल्लक राहिला असे दाखवले जात आहे. मात्र या पाण्यात मोठ्या प्रमाणावर गाळ शिल्लक राहिलेला आहे. पाणी सोडल्याने दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले असून पिकांची राखरांगोळी होण्याची भीती आहे. यावर्षी स्थानिकांना विचारात न घेता पोलिस प्रशासनाच्या बळाचा वापर करीत अचानक पाणी सोडण्यात आले. यामुळे शेतकर्‍यांना विरोध करण्यास वेळ मिळाला नाही गोदापात्रात कमी पाणीसाठा राहिल्याने गोदावरीचे वाळवंट होणार या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. 

टॅग्स :WaterपाणीDamधरणNandedनांदेडparabhaniपरभणी