शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या संशयावरून गावकऱ्यांची तिघांना जबर मारहाण, एकाचा मृत्यू 

By राजन मगरुळकर | Updated: May 27, 2023 14:43 IST

परभणी जिल्ह्यातील उखळद गावातील घटना, दोघे जण गंभीर जखमी

- गजानन नाईकवाडे ताडकळस (जि.परभणी) : चोरीच्या उद्देशाने गावात आल्याच्या संशयावरून तिघांना जबर मारहाण करण्यात आली. यात एक जणाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास परभणी तालुक्यातील उखळद गावात घडली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, परभणी तालुक्यातील बलसा खुर्द येथील तिघे जण उखळद येथे गेले असता सदरील युवक हे चोरीच्या उद्देशाने आल्याचा संशय धरून तिघांना काही लोकांनी जबर मारहाण केली. यामध्ये एक जणाचा मृत्यू झाला तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. या जखमींना तसेच मयतास परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. 

घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षक रागसुधा.आर., अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, ताडकळस पोलीस ठाण्याचे सपोनि.कपिल शेळके आदींनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शनिवारी दूपारपर्यंत सुरू होती, असे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीDeathमृत्यू