शहीद भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुकदेव यांच्या बलिदान दिनानिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहीद दिन पाळला. यानिमित्त युवा आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. शहरातील सहारा कॉलनी येथे शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी वकील, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
हमाल भवन, रेल्वे गुड्स शेड, महाबीज प्रक्रिया केंद्र या ठिकाणी आयटकच्या वतीने शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. एमआयडीसी येथे महिला व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनीही कार्यक्रम घेतला. त्याचप्रमाणे मनपा सफाई कामगारांच्या वतीने गांधी पार्क व प्रभाग कार्यालयात आदरांजली अर्पण करण्यात आली. पाथरी शहरातही मोंढा परिसरात हमाल कामगारांनी तसेच नेताजी शाळेत कार्यक्रम घेण्यात आला. परभणी तालुक्यातील उमरी माळ्याची, ब्राह्मणगाव, वडगाव, खेरडा, वाघाळा आदी ठिकाणीही शहीद दिनानिमित्त कार्यक्रम पार पडले.