गंगाखेड : शेत जमिनीच्या वाटणीतून रक्ताच्या नात्यात, भाऊबंदकीचे असंख्य वाद-विवाद, खून खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. मात्र, गंगाखेड तालुक्यातील खादगाव येथील दहिफळे कुटुंबातील प्रा. डॉ. बाळासाहेब, प्रा. युवराज व शेतकरी बंधू केशव या तीन भावंडात झालेल्या या शेत वाटणीची चर्चा सध्या राज्यभरात चर्चा सुरु आहे. प्राध्यापक म्हणून न स्थायिक असलेल्या दोन शिक्षित भार्वानी शेतात राबणाऱ्या शेतकरी भावास शेतीत, घर व इतर मालमत्तेत दिलेल्या अधिकच्या हिश्श्याने व साधलेल्या सामाजिक समतोलाचे कौतुक होत आहे.
खादगाव येथील आई सुशीलाबाई व वडील रंगनाथराव दहिफळे वय वर्षे अंदाजे ८५ ते ९०. रंगनाथराव हे या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख. प्रा. डॉ. बाळासाहेब, प्रा. युवराज व केशव हे तिघे रंगनाथरावांच्या मालमत्तेचे वारसदार, रंगनाथरावाच्या नावे खादगाव येथे १६ एकर शेत जमीन, कायद्याने त्यांचे वारसदार असलेल्या तिन्ही भावाच्या नावे समसमान ३ हिस्से होणे क्रमप्राप्त. मात्र, प्रा. बाळासाहेब व प्रा. युवराज या दोघांनी स्वतःला प्रत्येकी ३.५ एवढाच हिस्सा ठेवत शेतीचा संपूर्ण भार सांभाळणारा आपला तिसरा भाऊ केशव यास ९.५ एकर एवढा शेतजमिनीचा हिस्सा व गावातील घर तसेच भूखंडही केशव यांच्याच नावे केला. या आदर्शवत एक वाटणीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्राध्यापक असलेल्या दोन्ही भावांनी शेतकरी भातासाठी घेतलेली भूमिका त्यांचे वयोवृद्ध वडील रंगनाथराव दहिफळे यांच्याच उपस्थितीत व मार्गदर्शनात केली हे विशेष.
महिलांची भूमिकाही परिपक्वतेचीकुटुंबात पुरुषांच्या भूमिकेला समर्थक भूमिका घेत प्रा. बाळासाहेबांच्या सौभाग्यवती अलका तसेच प्रा. युवराज यांच्या सौभाग्यवती अश्विनी या दोर्धीची भूमिका अत्यंत परिपक्व व समयोचित ठरली. आपले कुटुंब एकसंध राहावे यासाठी पतीच्या भूमिकेला सकारात्मक भूमिका घेतल्याने दोन्ही भायंडा एवढ्याच दोन्हीही जावाची भूमिका कौटुंबिक एकसंघटतेची ठरली.