मासिक पाळीतही घेता येते लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:18 AM2021-05-06T04:18:26+5:302021-05-06T04:18:26+5:30

मासिक पाळीच्या काळात लस घ्यावी की नाही, याबाबत महिलांमध्ये संभ्रम आहे. मात्र लसीकरणामुळे शारीरिक प्रतिकारशक्ती वाढणार आहे. त्याचप्रमाणे कोरोनापासून ...

The vaccine can also be taken during menstruation | मासिक पाळीतही घेता येते लस

मासिक पाळीतही घेता येते लस

Next

मासिक पाळीच्या काळात लस घ्यावी की नाही, याबाबत महिलांमध्ये संभ्रम आहे. मात्र लसीकरणामुळे शारीरिक प्रतिकारशक्ती वाढणार आहे. त्याचप्रमाणे कोरोनापासून बचाव होणार आहे. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात लसीकरण करण्यास काहीच हरकत नाही. मात्र, गरोदरपणाच्या काळात चार ते ८ महिन्यांपर्यंत लसीकरण करू नये. या काळात सॅनिटायझर, मास्कचा वापर करून प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मासिक पाळीच्या काळात महिलांनी लसीकरण करण्यास हरकत नाही. मात्र, गरोदरपणाच्या ४ ते ८ महिन्यांत लसीकरण न करता प्रतिबंधात्मक उपाय करावेत. गरोदरपणाच्या आठव्या व नवव्या महिन्यात लसीकरणास हरकत नाही.

- डॉ. राजू सुरवसे, परभणी.

मासिक पाळीच्या काळात महिलांना लसीकरण करण्यास काहीच हरकत नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही तसे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महिलांनी लसीकरणासाठी पुढाकार घेऊन कोरोनापासून स्वत:ला सुरक्षित करून घ्यावे.

डॉ. स्मिता मधुसुदन मगर, परभणी.

गाईडलाईन काय सांगतात

महिलांच्या मासिक पाळीच्या काळात लसीकरण करण्यास काहीच अडचण नाही.

लसीकरणामुळे इतर अपाय होत नाहीत. उलट प्रतिकारशक्ती वाढते.

गरोदरपणाच्या काळात मात्र लसीकरण करावे की नाही, याबाबत शासनाचे योग्य मार्गदर्शन नाही.

त्यामुळे या काळात महिलांनी स्वत:ची काळजी घेणे उचित राहील.

Web Title: The vaccine can also be taken during menstruation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.