एकाच दिवशी अडीच हजार ग्रामस्थांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:21 AM2021-09-14T04:21:43+5:302021-09-14T04:21:43+5:30

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या आदेशाने तालुक्यातील १५ आरोग्य उपकेंद्र अंतर्गत शनिवारी हे शिबिर घेण्यात आले. त्यात तालुक्यात सर्वाधिक ३८० ...

Vaccination of two and a half thousand villagers in a single day | एकाच दिवशी अडीच हजार ग्रामस्थांचे लसीकरण

एकाच दिवशी अडीच हजार ग्रामस्थांचे लसीकरण

Next

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या आदेशाने तालुक्यातील १५ आरोग्य उपकेंद्र अंतर्गत शनिवारी हे शिबिर घेण्यात आले. त्यात तालुक्यात सर्वाधिक ३८० ग्रामस्थांचे लसीकरण बनवस येथे झाले. विशेषत: सायंकाळी ७ वाजेपर्यंत येथील लसीकरण चालले. येथील सरपंच प्रतिभा चंद्रशेखर लांडगे यांनी या शिबिरासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती. दुसरीकडे फरकंडा येथे २६५ ग्रामस्थांनी लस घेतली. तर पेठपिंपळगाव येथे २२५ जणांना कोरोनाची लस मिळाली. येथील ग्रामसेविका संजीवनी सूर्यवंशी यांनी या लसीकरणासाठी प्रयत्न केला. तर केरवाडी येथे १६७ जणांनी लस घेतली आहे. उर्वरित खडी, खोरस, रावराजूर, फळा, शेखराजूर, नाव्हलगाव, तांदुळवाडी, उक्कडगाव, कोळवाडी, पेठशिवणी, वाणी पिंपळगाव या गावांमध्ये दिवसभरात मोठ्या प्रमाणात लस देण्यात आली. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात लक्ष देण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती तालुका

केरवाडीत जनजागृती फेरी

केरवाडी येथे शिबिरापूर्व जनजागृती फेरी काढली. त्यात गावातील मॉर्निंग ग्रुपच्या स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. फेरीत केरवाडीच्या सरपंच मीराताई जाधव, साहेबराव जाधव, उपसरपंच विकास चमकुरे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण जाधव, दिलीप जाधव, सुरेश कुलकर्णी, प्रशांत जाधव, भागवत जाधव, आरोग्य कर्मचारी कडमपल्ले, परचारिका एस. आर. तम्मलवाड, आशा वर्कर द्वारका चमकुरे, आशा रत्नपारखी, प्रल्हाद पांचाळ, अनिकेत जाधव आदींची उपस्थिती होती. या फेरीमुळे १५७ ग्रामस्थांनी लस घेतली.

Web Title: Vaccination of two and a half thousand villagers in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.