देवगावफाटा ग्रामपंचायत कार्यालयात १० फेब्रुवारी रोजी अध्यासी अधिकारी अमोल माटकर यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित सदस्यांची सभा घेण्यात आली. या सभेला जिजाबाई सोन्ने, चंद्रकला सातपुते, राधा साळेगावकर, गुंफाबाई चव्हाण, शीतल मोरे, वृंदावनी मोरे, रामभाऊ कांबळे या सात ग्रा.पं. सदस्यांची उपस्थिती होती. येथील सरपंचपद हे अनुसूचित जमाती महिलांकरिता असल्याने या पदासाठी भाजपच्या जिजाबाई तुकाराम सोन्ने यांचा एकमेव अर्ज अल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तर, उपसरपंचपदासाठी शिवसेनेच्या चंद्रकला रखमाजी सातपुते व प्रतिस्पर्धी शीतल पवन मोरे यांचे अर्ज आले होते. येथे गुप्त मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये शिवसेनेच्या चंद्रकला सातपुते यांना चार मते तर शीतल पवन मोरे यांना तीन मते मिळाल्याने चंद्रकला रखमाजी सातपुते यांची बहुमताने उपसरपंचपदी निवड झाली. या निवडणूक प्रक्रियेत ग्रामसेवक एम.एस.पाटील, प्रतीक चव्हाण, पोलीस कर्मचारी ईघारे यांनी अध्यासी अधिकारी अमोल माटकर यांना सहकार्य केले. निवडीनंतर भाजपचे बाबुअप्पा साळेगावकर व शिवसेनेचे रामेश्वर बहिरट यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार केला. याप्रसंगी रामराव सातपुते, मोकिंदराव मोरे, गुलाबराव मोरे, सखाराम चव्हाण, राजेभाऊ पवार, रमेश महाराज मोरे, भगवानराव मोरे, पंडित मोरे, आश्रोबा खंदारे, गोविंद मोरे, अमोल सातपुते, दत्तराव सोन्ने, विठ्ठल सातपुते, लक्ष्मण सोन्ने, नागनाथ साळेगावकर, राधाकिशन मोरे आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.
भाजपच्या जिजाबाई सोन्ने यांची सरपंचपदी बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:19 IST