शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अनियंत्रित कारने दुचाकीवरील मित्रांना ५० फुट फरफटत नेले; एकजण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 18:53 IST

राष्ट्रीय महामार्ग ६१ वर कोल्हा शिवारातील  रेल्वे उड्डाणपूलावरील घटना 

मानवत : पाथरी ते परभणी राष्ट्रीय महामार्गावर कोल्हा परिसरात असलेल्या रेल्वे उड्डाणपुलावर टायर फुटल्याने अनियंत्रित झालेल्या भरधाव कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक देत फरफटत नेले. यात एकाचा मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर परभणी येथे उपचार सुरु आहेत. ही घटना ६ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.

कैलास कच्छवे हे शहरातील आठवडे बाजार परिसरातील एसबीआय शाखेत हंगामी कर्मचारी आहेत. दुपारी १ वाजेच्या सुमारास ते किरण गवळी व गोविंद नाईक ( रा शिवाजीनगर, मानवत ) यांच्या सोबत दुचाकीवर ( क्रमांक एम एच २२- ए  एफ ९०७८) मानवतकडून परभणीकडे जात होते. दुचाकी रेल्वे उड्डाणपुलावर आली असता परभणीकडून मानवतकडे येणाऱ्या कारचे ( क्रमांक एम एच २२ - ७५१) अचानक टायर फुटले. यामुळे चालकाचा कारवरील ताबा सुटला. कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक देत तिघा मित्रांना पन्नास फुटापर्यंत फरफटत नेले. 

या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले. तिघांनाही १०८ रुग्णवाहिकेतून परभणीतील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून  किरण  गवळी (२०) यास मृत घोषित केले. यानंतर कैलास कच्छवे आणि गोविंद नाईक यांच्यावर परभणी येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, कारचा चालक अपघातानंतर फरार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूparabhaniपरभणी