शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरट्यास परळीतून पकडले, तीन जिल्ह्यातील दहा गुन्हे उघडकीस, वीस वाहने हस्तगत

By राजन मगरुळकर | Updated: May 28, 2024 19:16 IST

आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे बीड, परळी, लातूर, मरुड, बार्शी, सोलापूर अशा विविध ठिकाणाहून वीस दुचाकी हस्तगत केल्या.

परभणी : शहरात होणाऱ्या दुचाकी चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला आदेश दिले होते. त्यानुसार पथकाने राज्यभरातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे बीड जिल्ह्यातील परळी येथून ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून वीस दुचाकी हस्तगत केल्या. यामध्ये राज्यातील विविध ठिकाणचे दहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी परभणी शहरात होणाऱ्या दुचाकी चोरीची गांभीर्याने दखल घेऊन गुन्हे उघडकीस आणणे आणि आरोपीस अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी शहरात चोरीला गेलेल्या दुचाकी चोरीचा तपास सुरू केला. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार, पोलीस कर्मचारी बालासाहेब तूपसमुद्रे, रवी जाधव, रफीयोद्दिन शेख, निलेश परसोडे, हुसेन पठाण, गणेश कौटकर, बालाजी रेड्डी, गौस पठाण यांनी माहितीच्या आधारावरून तांत्रिक विश्लेषण करून दुचाकी चोरीचे बरेच गुन्हे केलेला अखिल महबूब शेख (रा.मंगळवार पेठ, अंबाजोगाई) याने केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा करून सापळा रचून त्यास परळीतून ताब्यात घेतले. त्याने परभणीसह इतर जिल्ह्यातील गुन्हे करून अनेक दुचाकी चोरल्याची माहिती दिली. कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, सपोनि. पांडुरंग भारती, राजू मुत्येपोड, उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे, अजित बिरादार यांच्यासह पथकाने केली.

चार पथके विविध जिल्ह्यात तपासासाठीयात सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, राजू मृत्येपोड, पोउपनि. गोपीनाथ वाघमारे, अजित बिरादार यांच्या अधिपत्याखाली चार पथके तयार केली. आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे बीड, परळी, लातूर, मरुड, बार्शी, सोलापूर अशा विविध ठिकाणाहून वीस दुचाकी हस्तगत केल्या. त्याने चोरलेल्या दुचाकीची विल्हेवाट लावणारा त्याचा आणखी एक साथीदार असून त्याच्याकडे काही दुचाकी असल्याची माहिती आरोपीने दिली. त्याचाही शोध स्थागुशा पथकाकडून सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास गुरुवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली.

परभणी, सोलापूर, लातूरचे गुन्हे उघडकीससदर आरोपीकडून आतापर्यंत २० दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यातून परभणी जिल्ह्यातील सहा, सोलापूर दोन, लातूर दोन असे एकूण दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. इतर मिळून आलेल्या दुचाकीच्या संबंधाने दाखल गुन्ह्यांच्या तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी