शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आखाडा बाळापूर शाखेतील दोघे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 12:12 IST

परभणी येथील प्रशासन यावर काहीच बोलायला तयार नव्हते.

ठळक मुद्दे५० लाखांच्या घोटाळ्याची दिवसभर चर्चाखातेदारांच्या खात्यावरून रक्कमा गायब असल्याचा प्रकार

आखाडा बाळापूर ( हिंगोली) : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आखाडा बाळापूर शाखेतील शाखाधिकारी व रोखपालास निलंबित केले आहे, तर एका कर्मचाऱ्याची बदली केली आहे. या शाखेत ५0 लाखांच्या घोटाळाप्रकरणी ही कारवाई केल्याची चर्चा दिवसभर होती. मात्र, बँकेचे परभणी येथील प्रशासन यावर काहीच बोलायला तयार नव्हते.

आखाडा बाळापूर येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत तिमाही आॅडिटची प्रक्रिया नुकतीच पार पडली. त्यात काही खातेदारांच्या खात्यावरून रक्कमा गायब असल्याचा प्रकार समोर आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. त्यामुळे बरीच धापवळही झाली. तर अंतर्गत तपासणी अधिकाऱ्याने बाळापूर शाखेत तपासणी केली असता रोकड कमी असल्याचे निष्पन्न झाल्याचेही सांगितले जाते. त्यानंतर रोखपाल एस. एम. धांडे यांना ४ फेब्रुवारी रोजी निलंबित केल्याची माहिती बँकेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. तर चार दिवसांच्या फरकाने शाखाअधिकारी आर. एस. जाधव यांनाही निलंबित केले. तर एका कर्मचाऱ्याची बदली केली आहे. एकाच वेळी बँकेतील दोघांना निलंबित व एकास बदलीवर पाठविल्याने बाळापूर परिसरामध्ये हा विषय चर्चेचा बनला आहे. अनेकजन बँकेकडे विचारणा करीत आहेत, मात्र, बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे.

शाखाधिकारी रुजू बँकेत तातडीने शाखाधिकारी म्हणून साठे रुजू झाले आहेत. त्यांना याबाबत विचारणा केली असता मी आजच रुजू झालोय. याबाबत मला फारशी माहिती नाही, असे उत्तर देत त्यांनी हात वर केले. परभणी येथील मुख्य शाखेतील मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांना या संबंधी माहिती विचारण्यासाठी अनेक वेळा फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. बँकेने या घटनेवर कितीही पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला तरीही परिसरात मात्र बँकेत घोटाळा झाल्याची चर्चा सुरू आहे.

टॅग्स :suspensionनिलंबनbankबँकfraudधोकेबाजी