शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गंगाखेडमध्ये शॉर्टसर्किटने दोन दुकानांना आग; महागडे फर्निचर, कपडे जळून खाक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 16:53 IST

बालाजी फर्निचर आणि मयूर ड्रायक्लिनर्स ही दोन्ही दुकाने आगीत जळून खाक

- अनिल शेटेगंगाखेड(परभणी): शहरातील डाॅक्टर लाईन भागातील फर्निचर व ड्रायक्लिनर्स ही लगत असलेली दोन दुकाने शार्टसर्कीटने लागलेल्या आगीत जळून खाक झाली. या दोन्ही दुकानाचे मिळून अंदाजे वीस लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना आज पहाटे ४ वाजता घडली. नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत दोन्ही दुकाने खाक झाली.

अरविंद साळवे यांचे बालाजी फर्निचर आणि बंडू वाघमारे यांचे मयूर ड्रायक्लिनर्स ही दोन दुकाने डाॅक्टरलाईन भागात शेजारी आहेत. आज पहाटे अचानक शाॅर्टसर्कीट झाल्याने दोन्ही दुकानात आग लागली. काही वेळातच दोन्ही दुकाने आगीने वेढली. काही नागरिकांनी आगीची माहिती नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागास दिली. अग्निशमन दलातील राम खंडेलवार, शाम जगतकर, श्रीकांत साळवे, अभिजित साळवे,सुरज खंडेलवार यांच्या पथकाने काही वेळात आग आटोक्यात आली. मात्र, आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत दोन्ही दुकाने जळून खाक झाली होती.

आगीत अरविंद साळवे यांच्या दुकानातील तयार फर्निचर, मशीन्स आदी माल जळून अंदाजे ५ लाख रूपयांहून अधिकचे नुकसान झाले. तर बंडू वाघमारे यांच्या दुकानातील ड्रायक्लिन आणि लाँड्रीसाठी आलेले महागडे कपडे, मशीन्स आदी जळून अंदाजे १० लाखाचे नुकसान झाले.

टॅग्स :parabhaniपरभणीfireआग