शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सेलूत दोन गटातील हाणामारीत दोघे जखमी; परस्पर विरोधी गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 17:44 IST

सेलू पोलिसात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सेलू (परभणी ) : क्षुल्लक कारणावरुन दोन गटात झालेल्या  हाणामारीत दोन जण जखमी झाले.हा प्रकार विद्यानगर येथील विठ्ठल रुखमिनी मंदीराजवळ रविवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास घडला.याप्रकरणी दोन्ही गटाकडून फिर्याद देण्यात आली असून सेलू पोलिसात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सुमित लक्ष्मीकांत साखरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, महेश कलालडे व विठ्ठल कलालडे यांनी तुझे दुकान तिकडे आहे तु इकडे चकरा का मारतोस असे म्हणून सुमित व समीर यांच्यावर चाकूने हल्ला केला असे नमूद केले आहे. या चाकू हल्ल्यात सुमित आणि समीर गंभीर जखमी झाले आहेत. सुमीत साखरे यांच्या तक्रारीवरून महेश सुरेशराव कलालडे व विठ्ठल कलालडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

तर दुसरी फिर्याद महेश सुरेशराव कलालडे यांनी दिली असून त्यात म्हटले आहे की तु केदारला गल्लीत का घेऊन आला असे म्हणून सुमित लक्ष्मीकांत साखरे व समिर लक्ष्मीकांत साखरे या दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच घरी जाऊन आई वडीलांना धमक्या दिल्या. फिर्यादीच्या भावास तलवारीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला असे नमूद केले आहे.  

महेश कलालडे यांच्या फिर्यादीवरुन सुमित व समीर साखरे यांच्या विरुद्ध  सेलु पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या  प्रकरणी महेश व विठ्ठल कलालडे यांना अटक करण्यात आली आहे. तर सुमीत व समीर साखरे यांना उपचारार्थ परभणी येथे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा तपास  उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे व पोलिस निरिक्षक संदिपान शेळके हे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल