शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयातून पळालेलले दोन कोरोनाबाधित कैदी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 15:31 IST

जिल्हा कारागृहातील ८४ कैद्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने या कैद्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देपकडलेला एक कैदी खून प्रकरणातील तर दुसरा गांजाच्या तस्करी प्रकरणातील आहे.२४ तासाच्या आता पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून पळ काढलेल्या तीन कोरोनाबाधित कैद्यांपैकी दोघांना पोलिसांनी २४ तासाच्या आत जेरबंद केले आहे.

येथील जिल्हा कारागृहातील ८४ कैद्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने या कैद्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षातील एका हॉलमध्ये १६ कैद्यांवर उपचार सुरू होते. या हॉलमधील तीन कैद्यांनी स्वच्छतागृहाचे ग्रील तोडून पळ काढल्याची घटना १ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती.

या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली. कैद्यांना पकडण्यासाठी नानलपेठ पोलिस ठाण्याचे तीन आणि  स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे दोन पथक वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आले.  २ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे एकास आणि हिंगोली येथून एका कैद्यास ताब्यात घेण्यात आल्याची माहिती नानलपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली. 

पकडलेला एक कैदी खून प्रकरणातील तर दुसरा गांजाच्या तस्करी प्रकरणातील आहे.  पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक आर.रागसुधा, पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जमदाडे, पुयड, नाईक यांच्या पथकाने ही कामगिरी केली. दरम्यान पळून गेलेल्या आणखी एका कैद्याचा पोलीस शोध घेत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या भागात पथके रवाना केले  असून, लवकरच या कैद्यासही जेरबंद केले जाईल, अशी माहिती वाघमारे यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCrime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी