शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सरपण आणणे बेतले जीवावर; करपरा धरणात मातेसह दोन बालकांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 18:09 IST

जिंतूर तालुक्यातील निवळी येथील घटना, पाण्याचा अंदाज न आल्याचे बुडाल्याची चर्चा

- तुकाराम सर्जेबोरी (जि.परभणी) : सरपण आणण्यासाठी ३० वर्षीय महिला दोन बालकांसह जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा धरण परिसरात मंगळवारी सकाळी १० वाजता गेली होती. यानंतर सायंकाळी ५.३० च्या सुमारास दोन बालकांचे मृतदेह या धरणाच्या पाण्यावर तरंगताना आढळून आली होती. तर आज सकाळी महिलेचा मृतदेह धरणात सापडल्याने खळबळ उडाली आहे. 

निवळी बुद्रुक येथील नसरीन रसूल पठाण (३०), आयान रसूल पठाण (तीन वर्ष), सना रसूल पठाण (वय दीड वर्ष) अशी मयतांची नावे आहेत. जिंतूर तालुक्यातील निवळी येथील नसरीन रसूल पठाण या सरपण आणण्यासाठी करपरा धरण परिसरात मंगळवारी सकाळी दोन बालकांसह गेल्या होत्या. तहान लागल्यामुळे धरणकाठी पाणी आणण्यासाठी त्या बालकांना घेऊन गेल्या असता त्यांचा तोल गेल्याने निवळी धरणामध्ये त्या बुडाल्याचा संशय मंगळवारी दुपारी काही जणांना आला. 

दरम्यान, त्यानंतर बोरी पोलिस व ग्रामस्थांच्या मदतीने शोध कार्य सुरू झाले. मंगळवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास दोन चिमुकले या पाण्यात तरंगताना आढळून आले. मात्र, महिला बेपत्ता असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत शोध कार्य चालू होते. परंतू, अंधारामुळे शोधकार्य थांबले. यानंंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू केले असता बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास जलाशयातील पाण्यामध्ये नसरीन रसूल पठाण या देखील मृत अवस्थेत आढळून आल्या. या घटनेत सना रसूल पठाण (वय दिड) आयान रसूल पठाण (वय तीन) या बालकांचा व महिलेचा मृत्यू झाला.

११ वर्षीय मुलीचा वाचला जीवदरम्यान, ११ वर्षीय मुलगी शाळेत गेली होती म्हणून तिचा जीव वाचला, अशी चर्चा येथे सुरु होती. घटनास्थळी बोरी पोलिसांनी पंचनामा केला असून मृतकाचे शवविच्छेदन बोरीच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. बोरी ठाण्यामध्ये शेख महबूब शेख दादामिया (रा.जिंतूर) यांच्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सपोनि.वसंत मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे, के.जी.पतंगे, तूपसुंदर हे करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू