शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी-पाथरी रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक; मनपा कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू 

By राजन मगरुळकर | Updated: May 17, 2023 16:20 IST

श्याम लक्ष्मणराव रेंगे हे महापालिका कर्मचारी महासंघाच्या नवीन कार्यकारिणीमध्ये नुकतेच उपाध्यक्ष म्हणून नियुक्त झाले होते.

परभणी : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात पंप ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पाथरी रोडवरील भाजी मार्केट समोर घडली. दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

मनपा सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, श्याम लक्ष्मणराव रेंगे असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे. रेंगे हे मनपाच्या पाणीपुरवठा विभागात कारेगाव फिल्टर येथे पंप ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास श्याम रेंगे हे त्यांच्या दुचाकीवर पाथरी रोडवरील त्यांच्या घराकडे जात होते. त्यावेळी भाजी मंडई परिसरात समोरून येणाऱ्या दुचाकीची श्याम रेंगे यांच्या दुचाकीला धडक झाली. यामध्ये शाम रेंगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. यानंतर शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाली. बुधवारी सकाळी पाथरी रोडवरील सिंहगड फार्म हाऊस परिसरातील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातामध्ये समोरून येणाऱ्या दुचाकीवर एका रुग्णाला साप चावल्याने त्यास परभणीच्या जिल्हा रुग्णालयात आणले जात होते. या दरम्यान हा अपघात झाला. मात्र, या प्रकरणी बुधवारी दुपारपर्यंत कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता. सर्व घटनेला मनपा कर्मचाऱ्यांनी अधिकृत दुजोरा दिला. मयत शाम रेंगे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी, मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.

मनपा कर्मचारी महासंघाचे होते उपाध्यक्ष श्याम लक्ष्मणराव रेंगे हे महापालिका कर्मचारी महासंघाच्या नवीन कार्यकारिणीमध्ये नुकतेच उपाध्यक्ष म्हणून नियुक्त झाले होते. या निवडीला सहा महिन्यांचा कालावधी लोटला होता. या त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे मनपा कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. महापालिकेच्या कर्मचारी महासंघाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी पाणीपुरवठा अभियंता मिर्झा तन्वीर बेग, इस्माईल शेख, के.के.आंधळे, नजम खान, विकास रत्नपारखी, अभिजीत कुलकर्णी, विशाल उफाडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Accidentअपघातparabhaniपरभणी