शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जलाशयातील अवैध पाणी उपसा बंद करा; परभणी जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 16:35 IST

जिल्ह्यातील प्रकल्पांमधून होत असलेला अवैध पाणी उपसा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी अधिकार्‍यांना दिले आहेत. 

ठळक मुद्देयावर्षी जिल्ह्यात केवळ ६९.१४ टक्के पाऊस झाला आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या जलाशयात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही.पाऊस कमी झाल्याने उन्हाळ्यात भेडसावणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पाटबंधारे प्रकल्पातील पाणी ग्रामीण व शहरी भागातील पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आले. आरक्षित केलेल्या पाण्याची निगराणी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी करावी, या पाण्याचा अवैध उपसा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

परभणी : जिल्ह्यातील प्रकल्पांमधून होत असलेला अवैध पाणी उपसा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी अधिकार्‍यांना दिले आहेत. 

यावर्षी जिल्ह्यात केवळ ६९.१४ टक्के पाऊस झाला आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या जलाशयात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. विशेषत: पालम, जिंतूर, पाथरी, गंगाखेड या तालुक्यातील प्रकल्पांची परिस्थिती गंभीर आहे. पाऊस कमी झाल्याने उन्हाळ्यात भेडसावणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पाटबंधारे प्रकल्पातील पाणी ग्रामीण व शहरी भागातील पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आले. त्यामुळे आरक्षित केलेल्या पाण्याची निगराणी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी करावी, या पाण्याचा अवैध उपसा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

सद्यस्थितीत प्रकल्पातील पाण्याचा अवैध उपसा होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आगामी काळात टंचाईचे संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रकल्पातील पाणीसाठा संपला तर परिसरातील विहिरी व बोअरच्या पाणीपातळीवरही परिणाम होईल. या सर्व बाबी लक्षात घेता प्रकल्पातील पाणीसाठा जास्तीत जास्त कालावधीपर्यंत वापरता यावा, या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

पाणीसाठ्यात झपाट्याने घटपाटबंधारे विभागाने दिलेल्या १५ आॅक्टोबर २०१७ आणि २८ डिसेंबर २०१७ या दोन अहवालात पाणीसाठ्यातील फरक जिल्हाधिकार्‍यांनी तपासला. तेव्हा साठ्यात झपाट्याने घट झाल्याचे दिसून आले आहे. जलाशयातील पाण्याचा विद्युत मोटारीद्वारे सिंचनासाठी वापर होत असल्याच्या तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत. तेव्हा प्रकल्पाच्या जलाशयातील अवैध उपसा थांबविण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पथक गठित करावे, असे निर्देशही जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. 

असे राहील पथकप्रकल्प परिसरातील विद्युत मोटारी जप्त करणे, विद्युत कनेक्शन तोडणे, अवैध वीज वापरणार्‍यांवर कारवाई करणे आणि अवैध पाणी उपसा थांबविण्याची कामे करण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकात तहसीलदार हे पथक प्रमुख असून संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, वीज कंपनीचे अभियंता  हे सदस्य म्हणून काम पाहतील तर पाटबंधारे विभागाचे अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. 

टॅग्स :Waterपाणीwater transportजलवाहतूकparabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारी