शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय गोडाऊन बाहेरून ट्रक चोरीला; २५० क्विंटल स्वस्तधान्य गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 19:19 IST

पालम तालुक्यातील शासकीय गोडाऊन परिसरात घटना

पालम : तालुक्यातील पेठशिवणी येथील शासकीय धान्य गोडाऊन परिसरात लावलेला लावलेल्या ट्रकची चोरी करून त्यातील 250 क्विंटल गहू गायब करण्यात आले. सोमवारी (ता.२५) रात्री उशिरा या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

पालम तालुक्यातील केरवाडी येथील ट्रक चालक विनायक भगवानराव सोळंके (46) यांनी या प्रकरणी फिर्यादी दिली आहे. 23 जुलै रोजी सोळंके यांनी हिंगोली येथून ट्रकमध्ये (एमएच - 13, एएक्स-  3247 ) स्वस्तधान्य पुरवठ्याची २५० गव्हाची पोती भरली. रविवारी 24 जुलै रोजी रात्री 8 वाजता पालम तहसील कार्यालयाच्या पेठशिवणी येथील शासकीय धान्य गोदामात सोळंके ट्रकसह पोहचले. 

त्यानंतर 25 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सोळंके गोदामात पोहोंचले. मात्र, त्यांना ट्रक दिसून आला नाही. त्यांनी तत्काळ पालम पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यात 6 लाख रुपये किमतीचे 250 क्विंटल गहू असल्याचे फिर्यादीत नमूद केले. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक मारूती कारवार यांच्या पथकाला लोहा तालुक्यातील बोरगाव रोड सुभाष नगर येथील राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आढळून आला. पोलिसांनी ट्रकमध्ये पाहणी केली असता त्यातील सर्व धान्य गायब होते. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन पालम पोलीस ठाण्यात आणला आहे. पुढील तपास सपोनि कारवार करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी