शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

जीपच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीला ट्रकने चिरडले; नवदाम्पत्यांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 17:18 IST

मृत पती-पत्नींचा तीन महिन्यांपूर्वी झाला होता विवाह

मानवत (परभणी ) : राष्ट्रीय महामार्गावरील रत्नापुर येथे जीपच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीला ट्रकने चिरडल्याने नवदाम्पत्यांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी आहे. ही घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. 

पाथरील तालुक्याती पोहेटाकळी येथील भागवत गोंगे व आरती गोंगे हे पत्नी दुचाकीवरून मानवतकडे येत होते. रत्नापूरजवळ गोंगे यांनी जीपच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते समोरून येणाऱ्या  ट्रकवर ( एमएच 04 - बी 9374 ) आदळले. जोरदार धडकेने आरती दूरवर फेकल्या गेल्या आणि पाठीमागून वेगाने येणारी जीप त्यांच्या डोक्यावरून गेली. तर भागवत हे ट्रकवर आद्ल्याने गंभीर जखमी झाले. 

दोघाही जखमींना गणेश उक्कलकर, दत्ता शिंगणापूरे, दिपक कटारे या युवकांनी एका खाजगी दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी आरती यांना तपासून मृत घोषित केले. तर भागवत यांना पुढील उपचारासाठी परभणीकडे नेण्यात आले. मात्र, त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. भागवत आणि आरती यांच्या लग्नाना फक्त तीन महिने झाले होते. या घटनेमुळे पोहेटाकळी गावात शोककळा पसरली आहे. घटनास्थळावरुन जीप चालक फरार असून ट्रकचालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. 

टॅग्स :AccidentअपघातparabhaniपरभणीDeathमृत्यूhighwayमहामार्ग