शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

परभणी जिल्ह्यात १ हजार ५९४ रुग्ण कर्करोगाच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 19:45 IST

तंबाखूच्या अतिसेवनामुळे जिल्ह्यातील १ हजार ५९४ नागरिकांमध्ये कर्करोगाची तीव्र लक्षणे  आढळून आली आहेत. 

ठळक मुद्दे १ हजार ५९४ नागरिकांमध्ये कर्करोगाची तीव्र लक्षणे आढळून आली आहेत १ हजार ५९४ नागरिकांमध्ये कर्करोगाची तीव्र लक्षणे आढळून आली

परभणी : जिल्हा सामान्य रुग्णालयातील तंबाखू नियंत्रण कक्षाकडून करण्यात आलेल्या तपासणीत तंबाखूच्या अतिसेवनामुळे जिल्ह्यातील १ हजार ५९४ नागरिकांमध्ये कर्करोगाची तीव्र लक्षणे  आढळून आली आहेत. 

जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनाच्यानिमित्ताने जिल्ह्यात तंबाखू सेवन करणाऱ्या नागरिकांचा आढावा घेतला असता व्यसनाची पाळेमुळे खोलवर गेल्याचे पहावयास मिळत आहे. तंबाखूच्या अतिसेवनामुळे कर्करोग, -हदयविकार यासारखे आजार जडू शकतात. तंबाखुच्या अती सेवनामुळे कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे राज्य शासनाच्या लक्षात आले. यावर उपाय म्हणून महाराष्टÑ शासनाने २०१२ साली राज्यात तंबाखू मिश्रित गुटखा व सुगंधी तंबाखूच्या उत्पादनावर विक्री करण्यासाठी बंदी आणली.

३१ मे रोजी जगभरात तंबाखू सेवन विरोधी दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने तंबाखूचे व्यसन जडलेल्यांना तंबाखू सेवनापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने प्रयत्न केले जातात. याच पार्श्वभूमीवर परभणी शहरात तंबाखू विक्रीचा बुधवारी आढावा घेण्यात आला. परभणी शहरात १० ते १५ ठोक विक्रेते असून सुमारे १ हजार पानटपऱ्यावरून दररोज तंबाखूची विक्री होते. तंबाखू सेवन करणाऱ्यांमध्ये युवकांपासून ते वृद्धापर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. साध्या तंबाखूसह मावा, पान, गुटखा, खैनी, सिगारेट, बिडी या माध्यमातून तंबाखूचे सेवन केले जाते.

शहरातील सुमारे १ हजार पानटपऱ्यावरून दररोज १० ते १२ लाख रुपयांची उलाढाल होते. तर तंबाखू विक्रीच्या ठोक व्यापाऱ्यांकडूनही ८ ते १० लाख रुपयांची तंबाखू विक्री होत असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे हा आकडा यापेक्षाही अधिक असू शकतो. परभणी शहरात दररोज साधारण २० लाख रुपयांच्या तंबाखू विक्रीची उलाढाल होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर यामधून होणारे दुष्परिणाम जाणून घेण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील तंबाखू नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. या कक्षांमधून तंबाखूच्या अतिसेवनामुळे कर्करोग होण्याची लक्षणे जिल्ह्यातील १ हजार ५९४ नागरिकांमध्ये आढळून आल्याची माहिती मिळाली.

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मागील वर्षापासून जिल्ह्यात कर्करोगा संदर्भात तपासणी केली जात आहे. या तपासणीच्या अहवालानुसार १ हजार ५९४ रुग्णांमध्ये कर्करोगाची तीव्र लक्षणे आढळून आली आहेत. या नागरिकांची जिल्हा सामान्य रुग्णालयात तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नियमित तपासणी केली जात असल्याचेही येथील जिल्हा सल्लागार श्याम गमे यांनी सांगितले.

६ जणांना झाली कर्करोगाची लागणगुटखा, सुगंधी तंबाखूचे अतिसेवन केल्यानंतर संबंधित व्यक्तीला कर्करोगाचा धोका होऊ शकतो. जिल्हा सामान्य रुग्णालयातील तंबाखू नियंत्रण कार्यक्रम विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार १ हजार ५९४ नागरिकांमध्ये कर्करोगाची तीव्र लक्षणे आढळून आली आहेत. तर १ हजार ५९४ नागरिकांमध्ये कर्करोगाची तीव्र लक्षणे आढळून आली

जनजागृतीवर भर देण्याची गरजपरभणी शहरात दररोज गुटखा, सुगंधीत तंबाखुच्या विक्रीतून साधारणत: २० लाखांची उलाढाल होते. दररोजच्या तंबाखू विक्रीचा हा आकडा लक्षात घेता व्यसनाधिनतेचे प्रमाणही स्पष्ट होत आहे. तंबाखू व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी शासकीय पातळीवर जनजागृती करण्याची गरज आहे; परंतु, संबंधितांकडून याकडे दुर्लक्ष करीत कागदोपत्री मोहीम राबविली जात आहे. 

तंबाखूसेवनामुळे  देशात दरवर्षी १० लाख व्यक्तींचा होतो मृत्यूतंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने दरवर्षी जगात ५५ लाख तर भारतात १० लाख नागरिकांचा मृत्यू होतो. तंबाखूमधील अल्कोहोलाईड रसायनात कोटीनाईन, अ‍ॅन्टबीन, अ‍ॅनाबेसीन अशी रसायने असून भारतीय तंबाखूमध्ये मर्क्युरी, लेड, क्रोमियम, कॅडमियम आदी अतिविषारी रसायने सापडतात. या व्यतिरिक्त तंबाखूच्या धुरात व धुम्रपानात डीडीटी, बुटेन, सायनाईड, अमोनिया आदी रसायने आढळतात. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुफ्फुस, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, गर्भाशय, मुखाचा कर्करोग होतो. तंबाखूच्या सेवनाने त्यातील निकोटीनच्या प्रभावामुळे मेंदूचे कार्य थांबते. मेंदूची विचार करण्याची क्षमता कमी होते. तसेच जे लोक धूम्रपान करतात त्यांना हृदयघात होण्याची शक्यता अधिक असते.

टॅग्स :cancerकर्करोगParabhani civil hospitalजिल्हा रुग्णालय परभणीmedicineऔषधं