यासंदर्भात माहिती देताना देशमुख म्हणाले की, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर या ५ जिल्ह्यांत आंब्याचा हंगाम सध्या ऐन भरात असून, आवक वाढली आहे. मात्र, जगभरात प्रसिद्ध असलेल्या ‘हापूस’च्या नावाखाली कर्नाटक व आंध्रचा कमी प्रतीचा आंबा ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रकार परभणी जिल्ह्यात सुरू आहे. बऱ्याचदा ग्राहकांना माहिती नसल्यामुळे त्यांची सर्रास फसवणूक होत आहे. देवगड हापूस म्हणून पुठ्ठे बनविणाऱ्या कारखान्यात खोक्यांची निर्मिती करून देवगड, हापूस म्हणून लिहिलेल्या खोक्यात कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील आंबा विकून परभणीकरांची फसवणूक केली जात आहे. वास्तविकत: ‘हापूस’चे ‘जीआय’ मानांकन कोकण कृषी विद्यापीठासह चार संस्थांनी घेतले आहे. त्यांनाच ‘हापूस’ आंबा विकता येतो. हापूसच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
‘हापूस’च्या नावाखाली इतर आंबा ग्राहकांच्या माथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:17 IST