शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

तस्करांचा थरारक पाठलाग; ग्रामस्थांच्या सहकार्याने सव्वा दोन क्विंटल गांजा जप्त, दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 15:09 IST

चालकाने भरधाव वेगाने कार पाथरी शहरातील सेलू कॉर्नर परिसरातून सेलू रस्त्याकडे वळवली.

पाथरी ( परभणी ) : पेट्रोलिंगवर असलेले पाथरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी यांनी पाथरी-सेलू रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका संशयास्पद कारचा पाठलाग केला. बोरंगव्हानजवळ ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी कार अडवली. यात ११ लाख रुपये किंमतीचा २ क्विंटल २६ किलो गांजा आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे तर एक जण फरार झाला आहे. तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा पकडण्याची पोलीस कारवाई पहिल्यांदाच झाली आहे.

गणपती स्थापनेच्या अनुषंगाने  गुरुवारी रात्री ११ वाजेपासून पाथरी शहरात पोलिसांची गस्त सुरु होती. सहायक पोलीस निरीक्षक आणि चालक यांची पेट्रोलिंग सेलू उपविभागात होती. पहाटे ३ वाजेच्या सुमारास परभणीकडून एक कार पाथरी कडे आली. चालकाने भरधाव वेगाने कार पाथरी शहरातील सेलू कॉर्नर परिसरातून सेलू रस्त्याकडे वळवली. ही संशयास्पद बाब गस्तीवर असणारे सहायक पोलिस निरीक्षक सोमवंशी यांच्या लक्षात आली.  त्यांनी लागलीच कारचा पाठलाग सुरू केला. कार वेगाने पुढे जात बोरंगव्हानकडे गेली. येथे ग्रामस्थांना चोर आल्याचा संशय आल्याने त्यांनी कार अडवली. काही वेळात पोलिसांची गाडी दाखल झाली.

ग्रामस्थांच्या मदतीने गाडीतील एक महिला आणि चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.  एक जण मात्र फरार झाला. मारोती रामराव बोलेगावे ( सिरसदेवी ता. गेवराई. जि. बीड ) आणि शिला संतोष राहाडे ( रुही ता. गेवराई जि. बीड ) असे आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी गाडीची ( क्र एम एच 03 बी सी 5032 ) तपासणी केली असता त्यात गांज्याने भरलेल्या गोण्या आढळून आल्या. शुक्रवारी सकाळी १० वाजता पोलिसांनी पंचनामा केला. ७ लाख रुपये किंमतीची गाडी, ११ लाख ३०  हजार ५२५ रुपयांचा २ क्विंटल २६ किलो १५ ग्राम गांजा आढळून आला. यावेळी पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी , पोलीस उपनिरीक्षक चिरंजीव दलालवाड यांची उपस्थिती होती. परभणी जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा पकडण्याची पाथरी पोलिसांची पहिलीच कारवाई आहे. सहायक पोलीस निरीक्षक सोमवंशी यांनी गाडीचा थरारकरित्या पाठलाग करून कारवाई केल्याने त्यांचे स्वागत होत आहे .  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी