शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतील स्त्री रुग्ण विभागाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:45 IST

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्री रुग्ण विभाग व स्त्री रुग्णालयातील कामकाजासंदर्भात चौकशी करण्यासाठी औरंगाबाद येथील आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी, सहाय्यक संचालकांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यांची चौकशी समिती गठित केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्री रुग्ण विभाग व स्त्री रुग्णालयातील कामकाजासंदर्भात चौकशी करण्यासाठी औरंगाबाद येथील आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी, सहाय्यक संचालकांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यांची चौकशी समिती गठित केली आहे.परभणी येथे २००५ मध्ये स्त्री रुग्णालय मंजूर झाले व २००६ मध्ये ते जिल्हा रुग्णालयात कार्यान्वित झाले. स्त्री रुग्णालय सुरु करीत असताना जिल्हा रुग्णालयातील ७० खाटांचा स्त्री रुग्ण विभाग बंद करण्यात आला होता. तब्बल १२ वर्षे हा स्त्री रुग्ण विभाग बंद असल्याची बाब ८ व ९ नोव्हेंबर २०१७ रोजी दिल्ली येथील सीआरएमच्या पथकाने केलेल्या चौकशीत समोर आली होती. या पथकाने शासनाला आपला अहवाल सादर केला होता. त्या अनुषंगाने ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त १० मार्च २०१८ रोजी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली. जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला आपली चूक समजल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनीट येथे २० मार्च रोजी २० खाटांचा स्त्री रुग्ण विभाग सुरु करण्यात आला.जवळपास १२ वर्षे हा विभाग बंद असल्याने परभणीकरांचा याचा त्रास सहन करावा लागला. या संदर्भात आॅल इंडिया युथ फेडरेशनने आरोग्य उपसंचालकांकडे तक्रार केली होती. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील स्त्री रुग्ण विभाग व स्त्री रुग्णालयाच्या चौकशीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथील आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.विजय कंदवाड यांनी २ एप्रिल रोजी आदेश काढला आहे. त्यामध्ये या प्रकरणात चौकशी करण्यासाठी हिवताप विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.व्ही.एस.भटकर, आधीक्षक व्ही.एस.माने, सहाय्यक आधीक्षक एम.एम.फारोखी या तीन सदस्यांची चौकशी समिती गठित करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही तीन सदस्यीय समिती या प्रकरणाची वस्तुनिष्ठ सखोल चौकशी करुन याबाबतचा स्वयंस्पष्ट अभिप्राय आरोग्य उपसंचालकांना सादर करणार आहे. त्यामुळे १२ वर्षे जिल्हा रुग्णालयातील स्त्री रुग्ण विभाग का बंद केला गेला? याला जबाबदार कोण? याबाबतची माहिती स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीhospitalहॉस्पिटलAurangabadऔरंगाबाद